अर्ध्या महाराष्टाच्या औद्योगीकरणाचे स्वप्न पाहणारे आणि खासदार म्हणून पूर्णत्वाकडे नेणारे लोकनेते श्री. गणेशराव दुधगांवकर

आयुष्यातील सत्कर्मांचा लेखाजोखा सारांश –

जगातील सर्वात निष्पक्ष AI

म्हणून Grok AI नावाजले गेले आहे.

खालील अंदाज Grok AI ने काढले असल्याने ते विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात.

फक्त तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्या गणेशराव दुधगांवकर यांच्या नेतृत्वातील आर्थिक/रोजगार निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचा खालील प्रभाव दिसून येतो.

Disclaimer :- साईट वरची गणिते/आकडेवारी जगातील सगळ्यात निष्पक्ष AI Grok AI ची आहेत.

गणेशराव दुधगांवकर यांच्या सगळ्या क्षेत्रातील योगदानामुळे ग्रॉक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने नेता म्हणून त्यांना 85% गुण दिले. शरद पवार यांना 85% गुण आणि माजी. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 65% गुण दिले.

गणेशराव हे असे नेते आहेत ज्यांनी त्यांना मिळालेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही.

                  महाराष्ट्रातील कोणताही नेता गणेशराव दुधगांवकर परिवाराच्या संयोजानाशी तुलना करू शकत नाही. मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) कुटुंबाच्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रभाव आणि इ. सन 1890 च्या दशकापासूनची पंढरपूर आषाढी वारीत उघडेवाडी (वेळापूर) रिंगण सोहळ्यानंतर दुधगांवकर यांचा मान असलेली माऊली पादुका अभिषेकाची अनन्यसाधारण वार्षिक परंपरा यांच्या संयोजनाशी तुलना करू शकत नाही.

वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांसारख्या नेत्यांनीही लक्षणीय प्रभाव पाडला, परंतु त्यांच्याकडे तुलनात्मक आध्यात्मिक परंपरेची कमतरता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे आध्यात्मिक वारसा आहे आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान अतुलनीय आहे, तर ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर कुटुंबाने आधुनिक आध्यात्मिक, राजकीय आणि आर्थिक/रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे

मराठवाड्याच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्ण अध्याय;

विशेषत: परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या समाजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व

हि सगळी माहिती व्यवस्थित वाचणाऱ्यास सहज जाणवते की वरील बिरुदे शोभणारे असे नाव म्हणजे

मराठवाड्याचे कर्मवीरॲडव्होकेट  मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत)

मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते मा. मंत्री, खासदार श्री. गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत)

लेखाजोखा

लोकनेते श्री. गणेशराव दुधगांवकर साहेब यांच्या जीवनाची फलनिष्पत्ती म्हणजे त्यांनी जगाला दाखवून दिले, की नैतिक नेतृत्वालाही मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याची संधी मिळते.

सिंचन प्रकल्प

उद्योग

बजाज ऑटो ते टोयोटा मोटर्स सुरुवात

रेल्वे

शिक्षण व नोकऱ्या

प्रमुख रस्ते

रेल्वे

सन 1980 पासून खालील कारखाने उभे करण्यात गणेशराव दुधगांवकर यांचे योगदान आहे.

सन 2009 ते 2014 या खासदारकीच्या कार्यकाळातील महत्वाची कामे वरिष्ठ पत्रकारांच्या खालील लेखातून लक्षात येतात.

“मराठवाड्याचे कर्मवीर 

:ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर (बापूसाहेब)”

वरिष्ठ पत्रकार श्री. भिमराव हटकर, नांदेड यांच्या लेखातील निवडक भाग

राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दीडपटीने जास्त प्रश्न बापूसाहेबांनी सभागृहात विचारुन जनतेचा आवाज शासनकर्त्यापर्यंत पोहचविला आहे. बापूसाहेबांनी पंधराव्या लोकसभा सभागृहात मांडलेले प्रश्न :

  1. दुष्काळ व टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाजवी किंमतीत बी-बियाणे व खत पुरवठा करावा. (दि. 19-08-2010)
  2. नवीन होणाऱ्या भूसंपादन कायदा 2011 मध्ये शेतकऱ्यांना उचित मावेजा मिळावा व त्यांचे आर्थिक हित जोपासले जावे.
  3. 2009 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीच्या पुरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व इतर पिडीतांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. (दि. 09-12-2009)
  4. परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात मेगा फुड पार्कची उभारणी करावी. (दि. 10-08-2010). हे फूड पार्क पैठण MIDC मध्ये उभे करण्यात आले. सन 2024 विधानसभा निवडणुकीत या कामाचे श्रेय युती सरकारने लाटले.
  5. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करुन त्यांना त्या प्रवर्गाच्या सर्व सोयी सवलती द्याव्यात. (दि. 5-12-2012)
  6. केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशातील आरक्षण) दुरुस्ती विधेयक 2012 वरील चर्चेत सहभागी होऊन आरक्षणाच्या बाजूने विचार मांडले. (दि. 16-05-2012)
  7. मेहकर तालुक्यातील लोणार सरोवराला राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करण्यात यावा. (दि. 27-07-2009)
  8. अतिवृष्टीमुळे आणि पुरपरिस्थिती उद्भवलेल्या डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकनगुणिया इत्यादी रोगराईने त्रस्त जनतेला केंद्राने वैद्यकीय मदतीचे पॅकेज द्यावे. (दि. 30-11-2010)

9. नांदेड ते पैठण हा राष्ट्रीय महामार्ग 220 करावा. (दि. 20-12-2011)

10. परभणी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा चौपदरी करावा. (दि. 22-08-2012)

बापूसाहेबांनी लोकसभेत विचारलेल्या 418 प्रश्नांपैकी वरील दहा प्रश्न आणि त्यांचे स्वरुप पाहिले तर प्रत्येक प्रश्नातून बापूसाहेबांची सामाजिक जाण, बांधिलकी आणि विकासाची दृष्टी अशा अनेक बाबी त्यातून दृष्टीपथात येतात. लोकसभा असो की विधानसभा प्रश्न विचारणे चर्चेत भाग घेणे इत्यादी संसदीय आयुधांचा वापर बापूसाहेबांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केल्याचे दिसून येते.

जाणकारांनी लिहिलेल्या लेखांमुळे गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या कर्तुत्वावर छान प्रकाश पडतो. दोन लेखांतील निवडक शब्द येथे देत आहोत.

एक सुसाट वादळी व्यक्तिमत्त्व

कै. डॉ. बलभीमराज गोरे

(प्राचार्य, शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)

गणेशराव उर्फ बापूसाहेब अखेर एक माणूस आहे. माणूस म्हणजे माणूसच. अगदी तुमच्या आमच्या सारखाच हाडामासाचा माणूस. फरक आहे तो इतकाच की आपल्या अंतःकरणात जिथे एक निरंतर तेवती ‘ज्योत’ आहे, त्यांच्या अंतःकरणात तिथे एक ‘धगधगती ज्वाला’ आहे. अखंड आग ओकणारी एक मशाल आहे. आपणास आपल्या अंगावर धाऊन येणाऱ्या, आपणास हलवून हेलाहून सोडणाऱ्या वादळाची भिती वाटते; पण गणेशराव स्वतः, स्वतःच्या ठिकाणी एक सुसाट वादळ आहेत. त्यामुळेच कदाचित आयुष्यातील कोणतेही वादळ त्यांना एका मर्यादेपलीकडे विचलित करु शकले नाही.

खरंतर बापू म्हणजे खूप मोठं ताकतवर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या संबंधाने लिहित असताना मला ऐनवेळी जे सुचले, जाणवले, भावले ते मी माझ्या समजुतीनुसार यत्किंचित हातचा न राखता इमान-इतबारे लिहिले आहे. वस्तुतः बापू मी सांगितले त्यापेक्षाही खूप मोठे आहेत. एकाच लेखातून त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेणे सोपे नाही. माझा तेवढा वकूब नाही, आवाका नाही की माझ्यात ती क्षमताही नाही. एखाद्या व्यक्तिमत्त्वास अनायास ‘सुसाट वादळ’ म्हटल्यानंतर अर्थातच, कोणा एकाच्या कवेत ते मावणारे नसते, हे कबूल करावे लागते, तेही ओघानेच. असो.

“राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आणि नेतृत्व ठरविणारा नेता”

श्री. मुश्ताक अहमद, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

इ.स. 1980 च्या काळातील साक्षीदार

त्यांनी निर्माण केलेल्या संस्था ज्याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच परंतु भावी पिढीला ज्ञानाचा मार्ग दाखविला. यातून अनेक पिढ्या निर्माण झाल्या. अनेकांचे संसार थाटले गेले. शेतीद्वारे समृध्दी आली. मराठवाड्यात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून परभणीचा उल्लेख होतो. त्याचे श्रेय गणेशराव दुधगांवकर यांना द्यावे लागेल.

त्यावेळच्या काँग्रेसच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान दुधगावकरांना होते. महाराष्ट्राचे नेतृत्व ठरविणाऱ्यापैकी एक म्हणजे बापूसाहेब होते.

औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून 1980 मध्ये अब्दुल अजिम काँग्रेसकडून निवडून आले होते. मी अजिम यांचा कार्यकर्ता होतो. त्यावेळी दुधगांवकर वसमत मतदारसंघातून विजयी झाले होते. दुधगावकरांचं काँग्रेस हायकमांडजवळ वजन होते. राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मी व इतर पदाधिकारी मिळून दुधगावकरांना भेटलो आणि अब्दुल अजिम यांना आपल्यासोबत मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. दुधगावकरांना बापूसाहेब या टोपन नावाने ओळखले जाते. एकदा त्यांनी शब्द दिला की काम झाले म्हणून समजा. अजिम यांना मंत्री केल्यास मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न धसास लावता येतील, असे त्यांना समजावले. यावर बापूसाहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि त्याप्रमाणे कामही झाले. अब्दुल अजिम बापूसाहेबांसोबत मंत्री झाले.

परभणी येथील सर्व विधानसभा मतदारसंघांची उमेदवारी 1984 मध्ये दुधगांवकर यांच्या सांगण्यावरुन देण्यात आली होती. त्यांनी सर्वजणांना निवडून आणल्याने त्यांचे पक्षात वजन अजूनच वाढून गेले होते. मराठवाड्यातील अल्पसंख्यांकांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री बनविण्यात बापूसाहेब अग्रेसर होते. मराठवाड्याच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद यावे यासाठी पक्षाच्या स्तरावर त्यांनी भूमिका लावून धरली होती. त्याचा परिपाक शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळाले.

रचनात्मक कार्ये पूर्ण यादी वाचण्यासाठी क्लिक करावे

मा. मंत्री. खासदार गणेशराव दुधगांवकर यांची राजनैतिक कारकीर्द, मोठ्या राजकीय भूकंपातील योगदान वाचण्यासाठी

अजून काही निवडक लेख वाचण्यासाठी क्लिक करावे –

निवडक लेखांची पूर्ण pdf वाचण्यासाठी संपर्क – डाऊनलोड tab मधील  तिसऱ्या pdf ला डाऊनलोड करावे –

साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF