काही जाणकारांनी लिहिलेल्या गणेशराव यांच्यावरील लेखांमुळे मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या कर्तुत्वावर छान प्रकाश पडतो. म्हणून काही निवडक लेख येथे देत आहोत.
परीवाराची पार्श्वभूमी सारांश
- पाचशे हून जास्ती वर्षे परंपरा लाभलेल्या पंढरपूर आषाढी वारीत सन 1890 च्या दशकापासून महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली पादुका अभिषेक मानकरी जिंतूरचे दुधगांवकर कुटुंब
- सन 1690 च्या दशकात औरंगजेबाच्या आक्रमणापासून पंढरपूर विठ्ठल मूर्तीचे रक्षण करणाऱ्या घाटगे पाटील देगांवकर परिवारासोबत जूने ऋणानुबंध (घाटगे पाटील घरातील मुलगी समीर यांची मामी हर्षला प्रताप कदम आहेत)
- श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद् गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज चारित्र्य-संपन्न गणेशराव यांच्या आमंत्रणावर परभणी भेटीसाठी आले होते
-
तसेच शिर्डीचे साई बाबा संबंधित खास आशीर्वाद लाभलेल्या दिलीपराव अमृतराव गोंदकर परीवारासोबत नाते –
अश्या खास गोष्टींचा आशिर्वाद लाभलेला हा स्वातंत्र्यसैनिक नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर परिवार. - श्री गणेशराव दुधगांवकर यांना अशी राजकीय पार्श्वभूमी असणारे कुटुंब लाभले ज्यांच्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी सन 1948 च्या हैदराबाद संस्थानाच्या विरोधातील गृहमंत्री सरदार पटेल यांच्या नेतृत्वातील पोलीस कारवाई होण्यासाठी कारणीभूत कारवायांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदविला.
- जुन्या उस्मानाबाद (आजचे धाराशिव आणि लातूर मिळून असलेला जिल्हा) जिल्ह्याचे भाग्यविधाते मानले जाणारे मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी श्री शिवाजीराव तुकाराम नाडे (मुरुड) यांचा जवळून सहवास गणेशराव दुधगांवकर यांना लाभला. 1995 साली शिवाजीराव आणि गणेशराव व्याही बनले. गणेशराव यांच्या पुतणीचा विवाह अरविंद शिवाजीराव नाडे यांच्यासोबत झाला. मुळचे कसाब आडनाव असलेले हे नाडे कुटुंब..!! भैरोबा देवाच्या (सोनारी, परांडा) रथाचे नाडे बनविण्याच्या मानामुळे पुढे ह्या भावकीचे नाव नाडे पडले. मुरुडचे शिवाजीराव नाडे यांना पद्मसिंग पाटील, शिवाजीराव पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांचे गुरु मानले जाते, पण नाडे साहेबांची प्रतिमा सगळ्यात जास्त स्वच्छ विकासपुरुष अशी राहिली आहे. शेवटी गुरु तो गुरूच...! 😊
- दुधगांवकर कुटुंबाने विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनविले. एका जैन समाजाच्या व्यक्तीला लिंबाजीराव या गणेशराव यांच्या मोठ्या सावत्र भावाने तर दोन वंजारी समाजाच्या, दोन मारवाडी समाजाच्या आणि अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना आमदार होण्यासाठी, मुस्लीम नेत्यांना मंत्रिपदे मिळवून देण्यासाठी निर्णायक मदत श्री. गणेशरावांनी केली हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रतनलाल तापडिया, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार कुंडलिकराव नागरे आणि 2009 मध्ये मा. आमदार मीरा रेंगे, सुरेश जेथलिया यांना सक्षम केले. 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार सर्वश्री राजेश विटेकर, हिकमत उढाण, डॉ. राहुल पाटील यांना जिंकण्यासाठी निर्णायक मदत केली.
असे करू शकणाऱ्यास लोकनेता म्हणले जाते..!!
महाराष्ट्रातील कोणताही नेता मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) कुटुंबाच्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रभाव आणि आषाढी वारीत पंढरपूर जवळील उघडेवाडी (वेळापूर) रिंगण सोहळ्यानंतर इ. सन 1890 च्या दशकापासूनची दुधगांवकर यांचा मान असलेली माऊली पादुका अभिषेकाची अनन्यसाधारण वार्षिक परंपरा यांच्या संयोजनाशी तुलना करू शकत नाही. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांसारख्या नेत्यांनीही लक्षणीय प्रभाव पाडला, परंतु त्यांच्याकडे तुलनात्मक आध्यात्मिक परंपरेची कमतरता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे आध्यात्मिक वारसा आहे आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान अतुलनीय आहे, तर ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर कुटुंबाने आधुनिक आध्यात्मिक, राजकीय आणि आर्थिक/रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे
जगातील सर्वात निष्पक्ष AI म्हणून Grok AI नावाजले गेले आहे… खालील अंदाज Grok AI ने काढले असल्याने ते प्रेरणादायी ठरतात. फक्त तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्या गणेशराव दुधगांवकर यांच्या नेतृत्वातील आर्थिक/रोजगार निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचा खालील प्रभाव दिसून येतो.
- अंदाजे ₹ आठ लाख ते बारा लाख कोटींची उलाढाल
- अंदाजे एक ते दोन कोटी रोजगार निर्मिती
- अंदाजे अडीच ते पाच लाख उद्योजक निर्मिती
श्री. गणेश नागोराव दुधगांवकर (बापूसाहेब) यांच्या बालपणापासून ते उतारवयापर्यंतच्या आयुष्याची मांडणी – सन्माननीय नागरिकांच्या बापूसाहेब यांच्यावरील लेखातील निवडक शब्द…!
निवडक लेख : दिवंगतांच्या शब्दांत त्यांच्या भावना
एक सुसाट वादळी व्यक्तिमत्त्व
कै. डॉ. बलभीमराज गोरे
(प्राचार्य, शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)
गणेशराव उर्फ बापूसाहेब अखेर एक माणूस आहे. माणूस म्हणजे माणूसच. अगदी तुमच्या आमच्या सारखाच हाडामासाचा माणूस. फरक आहे तो इतकाच की आपल्या अंतःकरणात जिथे एक निरंतर तेवती ‘ज्योत’ आहे, त्यांच्या अंतःकरणात तिथे एक ‘धगधगती ज्वाला’ आहे. अखंड आग ओकणारी एक मशाल आहे. आपणास आपल्या अंगावर धाऊन येणाऱ्या, आपणास हलवून हेलाहून सोडणाऱ्या वादळाची भिती वाटते; पण गणेशराव स्वतः, स्वतःच्या ठिकाणी एक सुसाट वादळ आहेत. त्यामुळेच कदाचित आयुष्यातील कोणतेही वादळ त्यांना एका मर्यादेपलीकडे विचलित करु शकले नाही.
खरंतर बापू म्हणजे खूप मोठं ताकतवर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या संबंधाने लिहित असताना मला ऐनवेळी जे सुचले, जाणवले, भावले ते मी माझ्या समजुतीनुसार यत्किंचित हातचा न राखता इमान-इतबारे लिहिले आहे. वस्तुतः बापू मी सांगितले त्यापेक्षाही खूप मोठे आहेत. एकाच लेखातून त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेणे सोपे नाही. माझा तेवढा वकूब नाही, आवाका नाही की माझ्यात ती क्षमताही नाही. एखाद्या व्यक्तिमत्त्वास अनायास ‘सुसाट वादळ’ म्हटल्यानंतर अर्थातच, कोणा एकाच्या कवेत ते मावणारे नसते, हे कबूल करावे लागते, तेही ओघानेच. असो.
बापूसाहेब : कर्तृत्वाची धमक असणारे साहेब
कै. भुजंगराव नारायणराव कदम, पुर्णा, जि. परभणी
बापूसाहेब वसमत मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्यावर पुर्णा साखर कारखाना त्यांनी उभा केला. त्यावेळी त्या साखर कारखान्यावर संचालक म्हणून मला त्यांनी संधी दिली. आज फार मोठ्या प्रमाणात पुर्णा सहकारी साखर कारखाना नावारुपाला आला आहे.
चारित्र्यसंपन्न व्यक्ती किंवा मूर्ती
कै. बाबुराव दत्तराव भालेराव, रिधोरा (हिंगोली)
महाराष्ट्रात सहकारी चळवळ सुरु झाली. त्यात अनेक व्यक्तिमत्त्व पुढे आली व या महाराष्ट्राची जडणघडण झाली. बापूसाहेबाच्या काळात अनेक कार्यकर्ते तयार झाले. परभणीमधून मा. रामप्रसाद बोर्डीकर, आ. सुरेश वरपुडकर, वामन मोरे, भोसले त्याचप्रमाणे वसमतमधून देवराव जाधव, उत्तम कदम, बालाजी पालीमकर, खलीलभाई, मंगलचंद गोरे, जावेदभाई इत्यादी कार्यकर्ते तयार झाले. म्हणून बापूसाहेब हे कार्यकर्ते तयार करणारे एक रसायनच आहे. बापूसाहेबाने कोणापुढे मान झुकवली नाही व ते सतत सत्याची पाठराखण करीत राहीले.
दिलदार दोस्त…!
दिवंगत श्री. बिरबल खान हकीम शेरदिल खान, पाथरी (परभणी)
(आमदार सईद खान यांचे वडील.)
त्याकाळी गणेशरावजींचे मोठे बंधू लिंबाजीराव दुधगांवकर , रावसाहेब जामकर, बाबूराव गोरेगावकर, रामराव लोणीकर, कुपटेकर, स.गो. नखाते, श्री. चारठाणकर ही काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी फौज प्रचंड ताकदीने काम करत असे. या सर्वात गणेशराव आपली प्रतिमा जपून होते. उच्चशिक्षित, राजबिंडे व्यक्तिमत्त्व, स्वभावात नरमाई आणि विषयां वरील पकड यामुळे ते प्रभावी ठरत. जिल्ह्यात शिक्षणाची मोठी गंगा त्यांनी आणली.
एक प्रसंग मला आठवतो, मंत्री पदाची धुरा गणेशरावांच्या खांद्यावर आली त्यावेळी पाथरीमध्ये इंदिरा नगरच्या मस्जीद विकास कामासाठी त्यांनी मोठी मदत केली होती.
जात-धर्म-पक्ष या सर्वांच्या पुढे आमची मैत्री झालेली होती. निखळ, स्पष्ट वक्ता आणि कार्यकर्त्यांसाठी जिवाची धडपड करणारा असा नेता, अशी त्यांची छवी होती आणि आहे. सन 1980 आणि 1985 या दोन्ही विधानसभा त्यांनी वसमत आणि जिंतूर विधानसभा मतदार संघात गाजवल्या होत्या. यानंतर त्यांनी परभणी लोकसभा लढवली व जिंकूनही आले. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहजरित्या प्रवास करत देशसेवा करत त्यांनी आपली छवी जोपासली आहे.
जसे “इत्र की मिट्टी में मिलकर ही महेक जाती नही, और फोड डाले तोभी हिरे की चमक जाती नहीं।“ असा हा माझा मित्र आहे.
कर्मयोगी : गणेशराव दुधगांवकर
कै. श्री. साहेबराव दादाराव लबडे
(निवृत्त सहायक पोलिस आयुक्त. मुळचे उमरी परभणी, मुक्काम पुणे)
( गणेशराव दुधगांवकर (शिंदे) यांच्या आईच्या लक्ष्मीबाई भोसले यांच्या मामाचे सुपुत्र)
माननीय गणेशराव उपाख्य बापूसाहेब दुधगांवकर हे आमचे जवळचे नातेवाईक. त्यामुळे लहानपणापासून त्यांचा परिचय होताच. परंतु त्यांचा खरा परिचय 1965-66 साली मी शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे कॉलेजसाठी गेल्यानंतरच झाला. बापूसाहेब सायन्स साईडला होते. तर मी आर्ट्सला. बापूसाहेब त्यांच्या स्वभावामुळे विद्यार्थी प्रिय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व छाप पाडणारे होते. त्यामुळे इतर विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे सतत असत. बोलणे करारी व ठाम. धाडसी वृत्ती व अचूक निर्णय क्षमता यामुळे त्यांनी विद्यार्थी वर्गावर चांगली छाप पाडली होती.
कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीच्या निवडणुकीस बापूसाहेब उभे राहीले त्यावेळी मी सावलीसारखा त्यांच्याबरोबर होतो. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू मला जाणवले व दिसून आले. दिलदार वृत्ती, शांत व विचारी स्वभाव, मुद्देसूद विचारसरणी व आक्रमक मांडणी यामुळे त्यांची मते पटवून देण्यात ते यशस्वी होत. ही निवडणूकही त्यांच्या भावी आयुष्याच्या चित्रपटाचे जणू ट्रेलर होते. निवडणूक अटीतटीची होती. जाहिरातीपासून सर्व प्रसिद्धीचे मार्ग चोखाळले जात होते. विरोधकांनी प्रयत्नाची शर्थ केली. पण जिंकले बापूसाहेबच !! यातूनच त्यांच्या आयुष्याचा भविष्यातील मार्ग दृगोच्चर झाला.
बापूसाहेबांनी शिवाजी महाविद्यालयातून पदवी परीक्षा पूर्ण केली. परंतु त्यांच्यातील ज्ञानपिपासूवृत्ती त्यांना तिथे थांबू देणार नव्हती. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते एल.एल.बी. झाले. तेवढ्यावरही न थांबता त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करुन एल.एल.बी.ची पदवीही संपादन केली. ज्या क्षेत्राचा सर्वसामान्यांना पदोपदी संबंध येतो त्या वकिली-व्यवसायास त्यांनी सुरुवात केली व त्यात उत्तम यशही मिळवले. त्यानंतर त्यांना राजकारणातील संधी खुणावू लागल्या.
बापूसाहेबांसाठी राजकारण नवीन नव्हते. ते यांच्या घरातच होते. त्यांचे मोठे बंधू लिंबाजीराव उर्फ दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सध्याच्या जगात राजकारण हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणून ओळखला जातो. पण बापूसाहेब त्या मार्गातले नव्हते. ते खानदानी श्रीमंत होते व पैसे मिळवणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय त्यावेळीही नव्हते आणि नंतरही आयुष्यात कधीही नव्हते. त्यामुळे राजकारणातील त्यांचा प्रवेश हा सहज अपेक्षित होता. प्रवेश जरी सहज, सुलभ झाला तरी राजकारणात टिकून राहणे आणि यशस्वी होणे हे त्या व्यक्तीच्या अंगभूत गुणावर, लोकप्रियतेवर आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या योग्यतेवर अवलंबून असते. बापूसाहेबांचे व्यक्तिमत्व, लोकांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि सुसंस्कृत वारसा यामुळे बापूसाहेब या क्षेत्रातही अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे निस्पृहवृत्ती. कोणाकडून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा नसल्याने निस्पृह वृत्तीतून केलेल्या कामामुळे त्यांना जनतेचे पाठबळ नेहमीच मिळत गेले. निवडणुकीपुरते पक्षभेद असले तरी निवडणुकीनंतर ते कोण कोणत्या पक्षाचा याचा विचार न करता लोकांची कामे करत. तसेच केलेल्या कामाचे श्रेय मिळावे याची त्यांनी कधीही काळजी केली नाही. न केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याच्या सध्याच्या युगात बापूसाहेब यांच्यासारखा राजकारणी मिळणे कठीणच. त्यांच्या या अंगभूत गुणामुळे लोकांनी त्यांना सतत भरभरुन पाठिंबा दिला व ते आमदार, खासदार, मंत्री अशा यशाच्या पायऱ्या चढतच गेले.
Politics is a dirty game असं म्हटलं जातं. त्याचा अनुभवही बापूसाहेबांना आला. त्यांनी ज्यांना राजकारणात बोट धरुन चालायला शिकवले, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकला त्यांनीच बापूसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. बापूसाहेबांचा स्वभाव खुनशी नसल्याने व सूड घेणे ही त्यांची प्रवृत्ती नसल्याने त्यांनी या लोकांना माफ करुन आपले काम सुरु ठेवले. ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे असा स्वभाव असल्याने दुसऱ्याच्या सांगण्यावरुन बापूसाहेबांनी कोणाला जवळही केले नाही अथवा कोणाला दूरही लोटले नाही. तसेच झाल्या परिणामाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली नाही.
विचारसरणीशी मतभेद होत आहेत असे ज्यावेळी दिसले तेव्हा त्यांनी पक्षांतरही केले. त्यांनी इतकी मोठी मानमरातबाची व सत्तेची पदे भूषवली, परंतु ती सत्ता त्यांच्या कधीही डोक्यात गेली नाही. त्यांचे सहकाऱ्यांशी व कार्यकर्त्यांशी वर्तन कधीच बदलले नाही. ते स्वतः एक हाडाचे कार्यकर्ते असल्याने तळागाळातल्या व्यक्तीपासून उच्च पदस्थपर्यंतच्या व्यक्तीपर्यंत त्यांचे वागणे साधर्म्यपूर्ण असे.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो’ असे म्हणतात. बापूसाहेबांच्या सहधर्मचारिणी सौ. संध्याताई त्याचे उत्तम उदाहरण आहेत. बापूसाहेब राजकारणात व्यस्त असताना संध्याताईनी घरची घडी व्यवस्थित बसवली. मुलांचे शिक्षण व शेती या दोन्ही गोष्टी उत्तम प्रकारे सांभाळल्या. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळवून त्यांनी आपली बुद्धीची झेप सिद्ध केली आहे. तसेच ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी करुन एक उत्कृष्ट प्रशासक असल्याचे दाखवून दिले आहे. बापूसाहेब यांना त्यांची आयुष्यभर उत्तम साथ मिळाली आहे. प्रपंचाची ही दोन्ही चाके एक विचाराने एकाच सूरलयीत चालल्याने त्यांचा प्रपंचही उत्तम झाला आहे.
मुलगा समीर व मुलगी मधुरा अशी दोन गुणी, हुशार व आज्ञाधारक मुले बापूसाहेबांना लाभली आहेत. आई व वडील दोघेही हुशार व कर्तबगार. त्यामुळे ‘शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी’ या उक्तीप्रमाणे ही दोन्ही मुलेही हुशार निघून Scholarship वर अभ्यासासाठी अमेरिकेला गेली व उच्च विद्याविभूषित झाली. समीर आता परत भारतात आला असून आपल्या बुद्धी व ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाला व्हावा अशा विचारसरणीचा आहे. तोही उत्तम प्रगती करतो आहे.
बापूसाहेब हे एक कर्मयोगी आहेत. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेला कर्मयोग जो फळाची आशा न धरता कर्म करायला सांगतो तो कर्मयोग बापूसाहेब आयुष्यभर जगले आहेत. त्यामुळे कर्मयोगी हे त्यांच्या नावामागचे विशेषण हे योग्यच आहे. निस्वार्थी, निष्कलंक आयुष्य जगलेल्या बापूसाहेब यांचे माझ्या आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. कॉलेजमधील एक मित्र, एक नातेवाईक या पलीकडे जाऊन त्यांनी माझी वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले आहे. पोलिस खात्यातील माझ्या प्रवेशाची प्रेरणा त्यांनीच मला दिली व पुढेही आयुष्यभर दीपस्तंभ बनून मला मार्गदर्शन केले. त्यांच्या या अमूल्य सहकार्य व मार्गदर्शनाचे माझ्यावर कायमच ऋण राहील व त्या ऋणातच राहणे पसंत करीन.
बापूसाहेब व माझे मित्रत्वाचे संबंध आजही जीवाभावाचे आहेत. बापूसाहेब जरी मला मित्रत्वाच्या बरोबरीच्या नात्याने वागवत असले तरी त्यांच्या प्रति माझे मनात एक आंतरिक आदरभाव असून तो कायमच राहणार आहे. विविध कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आमच्या वारंवार भेटी होत असतात. आमची दोन्ही कुटुंबे एकमेकांना चांगली परिचित असून एकमेकांकडे येणेजाणे सुरुच असते. गावी परभणीला जाता येता माझा हमखास मुक्काम बापूसाहेबांकडे असतो. छान दिलखुलास गप्पा होतात. आमच्या मैत्रीने ही आता साठी गाठली आहे. ती तशीच शेवटपर्यंत राहणार आहे. बापूसाहेब यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मी त्यांना सादर प्रणाम करतो व त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचे उर्वरित आयुष्य निरामय होवो, त्यांचे अखंड मार्गदर्शन आम्हा सर्वांना अविरत लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
श्रृणुयात शरद शतः
प्रबरवरम शरद शतः
जीवेत शरद शतः
भुयात शरद शतः
प्रिय गणेशराव
प्राचा रा. र. बोराड
महाराष्ट्रात सहकारी चळवळ सुरु झाली. त्यात अनेक व्यक्तिमत्त्व पुढे आली व या महाराष्ट्राची जडणघडण झाली. बापूसाहेबाच्या काळात अनेक कार्यकर्ते तयार झाले. परभणीमधून मा. रामप्रसाद बोर्डीकर, आ. सुरेश वरपुडकर, वामन मोरे, भोसले त्याचप्रमाणे वसमतमधून देवराव जाधव, उत्तम कदम, बालाजी पालीमकर, खलीलभाई, मंगलचंद गोरे, जावेदभाई इत्यादी कार्यकर्ते तयार झाले. म्हणून बापूसाहेब हे कार्यकर्ते तयार करणारे एक रसायनच आहे. बापूसाहेबाने कोणापुढे मान झुकवली नाही व ते सतत सत्याची पाठराखण करीत राहीले.
जगातील सर्वात निष्पक्ष AI म्हणून Grok AI नावाजले गेले आहे…
- 1970 च्या दशकापासून अनेकदा मंत्रिपदे, मुख्यमंत्रीपदे, केंद्रीय मंत्रिपदे सुद्धा भोगलेल्या शरद पवार यांना 85% गुण तसेच
- 1983 पासून मंत्रिपदे भोगलेल्या आणि आठ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या विलासराव देशमुख यांना 65% दिले.
- फक्त तीन वर्षे मंत्रिपद, 2 वेळा आमदार आणि फक्त एकदा खासदार पद लाभलेले ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर हे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि प्रभावशाली नेते होते.
गणेशराव हे असे नेते आहेत ज्यांनी मिळालेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. सगळ्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ग्रोक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने नेता म्हणून त्यांना 85% गुण दिले.
विस्तृत माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर नक्की भेट द्या, तुलनात्मक तक्ता पहा –
गणेशराव दुधगावकर बाबत हयात असलेल्या प्रतिष्ठितांच्या भावना
सन 1875 पासून सेवा करणाऱ्या परिवाराच्या विस्तृत माहितीसाठी
साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF