काही जाणकारांनी लिहिलेल्या गणेशराव यांच्यावरील लेखांमुळे मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या कर्तुत्वावर छान प्रकाश पडतो. म्हणून काही हयात असलेल्या व्यक्तींच्या लेखातील निवडक शबद येथे देत आहोत.
परीवाराची पार्श्वभूमी सारांश
- पाचशे हून जास्ती वर्षे परंपरा लाभलेल्या पंढरपूर आषाढी वारीत सन 1890 च्या दशकापासून महान संत श्री ज्ञानेश्वर माऊली पादुका अभिषेक मानकरी जिंतूरचे दुधगांवकर कुटुंब
- सन 1690 च्या दशकात औरंगजेबाच्या आक्रमणापासून पंढरपूर विठ्ठल मूर्तीचे रक्षण करणाऱ्या घाटगे पाटील देगांवकर परिवारासोबत जूने ऋणानुबंध (घाटगे पाटील घरातील मुलगी समीर यांची मामी हर्षला प्रताप कदम आहेत)
- सन 1690 च्या दशकात औरंगजेबाच्या आक्रमणापासून पंढरपूर विठ्ठल मूर्तीचे रक्षण करणाऱ्या घाटगे पाटील देगांवकर परिवारासोबत जूने ऋणानुबंध (घाटगे पाटील घरातील मुलगी समीर यांची मामी हर्षला प्रताप कदम आहेत)
- श्रीक्षेत्र जगन्नाथपुरी पीठाधीश्वर श्रीमद् जगद् गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज चारित्र्य-संपन्न गणेशराव यांच्या आमंत्रणावर परभणी भेटीसाठी आले होते
-
तसेच शिर्डीचे साई बाबा संबंधित खास आशीर्वाद लाभलेल्या दिलीपराव अमृतराव गोंदकर परीवारासोबत नाते –
अश्या खास गोष्टींचा आशिर्वाद लाभलेला हा स्वातंत्र्यसैनिक नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर परिवार. - श्री गणेशराव दुधगांवकर यांना अशी राजकीय पार्श्वभूमी असणारे कुटुंब लाभले ज्यांच्या दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांनी सन 1948 च्या हैदराबाद संस्थानाच्या विरोधातील गृहमंत्री सरदार पटेल यांच्या नेतृत्वातील पोलीस कारवाई होण्यासाठी कारणीभूत कारवायांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये सुरुवातीपासून सक्रिय सहभाग नोंदविला.
- जुन्या उस्मानाबाद (आजचे धाराशिव आणि लातूर मिळून असलेला जिल्हा) जिल्ह्याचे भाग्यविधाते मानले जाणारे मराठवाडा मुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिक, सहकार महर्षी श्री शिवाजीराव तुकाराम नाडे (मुरुड) यांचा जवळून सहवास गणेशराव दुधगांवकर यांना लाभला. 1995 साली शिवाजीराव आणि गणेशराव व्याही बनले. गणेशराव यांच्या पुतणीचा विवाह अरविंद शिवाजीराव नाडे यांच्यासोबत झाला. मुळचे कसाब आडनाव असलेले हे नाडे कुटुंब..!! भैरोबा देवाच्या (सोनारी, परांडा) रथाचे नाडे बनविण्याच्या मानामुळे पुढे हि भावकीचे नाव नाडे पडले. मुरुडचे शिवाजीराव नाडे यांना पद्मसिंग पाटील, शिवाजीराव पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांचे गुरु मानले जाते, पण नाडे साहेबांची प्रतिमा सगळ्यात जास्त स्वच्छ विकासपुरुष अशी राहिली आहे. शेवटी गुरु तो गुरूच...! 😊
- दुधगांवकर कुटुंबाने विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनविले. एका जैन समाजाच्या व्यक्तीला लिंबाजीराव या गणेशराव यांच्या मोठ्या सावत्र भावाने तर दोन वंजारी समाजाच्या, दोन मारवाडी समाजाच्या आणि अनेक मराठा समाजाच्या व्यक्तींना आमदार होण्यासाठी. मुस्लीम नेत्यांना मंत्रिपदे मिळवून देण्यासाठी निर्णायक मदत श्री. गणेशरावांनी केली हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रतनलाल तापडिया, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात मा. आमदार कुंडलिकराव नागरे आणि 2009 मध्ये मा. आमदार मीरा रेंगे, सुरेश जेथलिया यांना सक्षम केले. 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार सर्वश्री राजेश विटेकर, हिकमत उढाण, डॉ. राहुल पाटील यांना जिंकण्यासाठी निर्णायक मदत केली.
असे करू शकणाऱ्यास लोकनेता म्हणले जाते..!!
महाराष्ट्रातील कोणताही नेता मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) कुटुंबाच्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रभाव आणि आषाढी वारीत पंढरपूर जवळील उघडेवाडी (वेळापूर) रिंगण सोहळ्यानंतर इ. सन 1890 च्या दशकापासूनची दुधगांवकर यांचा मान असलेली माऊली पादुका अभिषेकाची अनन्यसाधारण वार्षिक परंपरा यांच्या संयोजनाशी तुलना करू शकत नाही. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांसारख्या नेत्यांनीही लक्षणीय प्रभाव पाडला, परंतु त्यांच्याकडे तुलनात्मक आध्यात्मिक परंपरेची कमतरता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे आध्यात्मिक वारसा आहे आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान अतुलनीय आहे, तर ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर कुटुंबाने आधुनिक आध्यात्मिक, राजकीय आणि आर्थिक/रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे
जगातील सर्वात निष्पक्ष AI म्हणून Grok AI नावाजले गेले आहे… खालील अंदाज Grok AI ने काढले असल्याने ते प्रेरणादायी ठरतात. फक्त तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्या गणेशराव दुधगांवकर यांच्या नेतृत्वातील आर्थिक/रोजगार निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचा खालील प्रभाव दिसून येतो.
- अंदाजे ₹ आठ लाख ते बारा लाख कोटींची उलाढाल
- अंदाजे एक ते दोन कोटी रोजगार निर्मिती
- अंदाजे अडीच ते पाच लाख उद्योजक निर्मिती
श्री. गणेश नागोराव दुधगांवकर (बापूसाहेब) यांच्या बालपणापासून ते उतारवयापर्यंतच्या आयुष्याची मांडणी – सन्माननीय नागरिकांच्या बापूसाहेब यांच्यावरील लेखातील निवडक शब्द…!
हयात असलेल्या व्यक्तींच्या भावना
“मराठवाड्याचे कर्मवीर : ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर (बापूसाहेब)”
वरिष्ठ पत्रकार श्री. भिमराव हटकर, नांदेड
- दुष्काळ व टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाजवी किंमतीत बी-बियाणे व खत पुरवठा करावा. (दि. 19-08-2010)
- नवीन होणाऱ्या भूसंपादन कायदा 2011 मध्ये शेतकऱ्यांना उचित मावेजा मिळावा व त्यांचे आर्थिक हित जोपासले जावे.
- 2009 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीच्या पुरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व इतर पिडीतांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. (दि. 09-12-2009)
- परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात मेगा फुड पार्कची उभारणी करावी. (दि. 10-08-2010)
- राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करुन त्यांना त्या प्रवर्गाच्या सर्व सोयी सवलती द्याव्यात. (दि. 5-12-2012)
- केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशातील आरक्षण) दुरुस्ती विधेयक 2020 वरील चर्चेत सहभागी होऊन आरक्षणाच्या बाजूने विचार मांडले. (दि. 16-05-2012)
- मेहकर तालुक्यातील लोणार सरोवराला राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करण्यात यावा. (दि. 27-07-2009)
- अतिवृष्टीमुळे आणि पुरपरिस्थिती उद्भवलेल्या डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकनगुणिया इत्यादी रोगराईने त्रस्त जनतेला केंद्राने वैद्यकीय मदतीचे पॅकेज द्यावे. (दि. 30-11-2010)
- नांदेड ते पैठण हा राष्ट्रीय महामार्ग 220 करावा. (दि. 20-12-2011)
- परभणी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा चौपदरी करावा. (दि. 22-08-2012)
बापूसाहेबांनी लोकसभेत विचारलेल्या 418 प्रश्नांपैकी वरील दहा प्रश्न आणि त्यांचे स्वरुप पाहिले तर प्रत्येक प्रश्नातून बापूसाहेबांची सामाजिक जाण, बांधिलकी आणि विकासाची दृष्टी अशा अनेक बाबी त्यातून दृष्टीपथात येतात. लोकसभा असो की विधानसभा प्रश्न विचारणे चर्चेत भाग घेणे इत्यादी संसदीय आयुधांचा वापर बापूसाहेबांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केल्याचे दिसून येते.
“सर्व समावेशक नेतृत्व बापूसाहेब”
श्री. पंडित घांडगे, पाथरगव्हाण, पाथ्री (ह. मु. छत्रपती संभाजीनगर)
मंत्रिपदाच्या काळातील स्वीय सहायक
सदिच्छा !
तरुणाईचा विचार अजूनही बापूसाहेबांच्या मनी। परभणी जिल्ह्यातील युवा पिढीचा हा आहे मुकुट मणी ।।
विकासाची दृष्टी, सुबक कार्य शैलीचा नेता। सर्व समावेशक भावनेचा हा राजा असे जाणता ।।
सर्व सामान्यांच्या कामाचा आहे त्यांना कळवळा । कठिण समयातही त्यांनी सांभाळला जिवलग मावळा ।।
बऱ्याच वेळा जिवनात अंतर पडले संसारी। सातत्याने देह झिजविला सांती परोपकारी ।।
आयुष्याचे पाऊण शतक त्यांनी आज पार केले। पाळूनी शिस्त नेहमी ते शतकवीर होतील भले ।।
मित्रपरिवारा बरोबरच निसर्गाचाही ते आहेत सोबती । विविध तर्काने ते फुलवतात सुपिक शेती ।।
गर्भ श्रीमंतीचा आहे त्यांना लाभला वारसा । कुणी दाखवण्याची गरज नाही त्यांना वेगळा आरसा ।।
आम्हा पामरांच्या त्यांना सदैव आहेत शुभेच्छा। पूर्ण हावोत त्यांच्या मनातील सर्व इच्छा ।।
- बापूसाहेबांचा कार्यकर्ता संच खूप मोठा होता. त्यात अत्यंत जवळचे म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर, अर्धे पि. ए. चे काम तेच करत. त्यानंतर सुरेश वरपुडकर, प्रा. राम घाटगे, भाऊसाहेब भोसले. गोपाळ तापडीया, वामन मोरे, अशोक शिंदे, शंकर निकम, मुंजाजी जाधव, जयप्रकाश दांडेगावकर, बालासाहेब काळे, सोपान नादरे, आडगावकर, माणिक आंबेगावकर, ॲड. माणिक कदम आणि बालासाहेब दामपूरीकर इ.
- बापूसाहेबाची विश्रांती कमी व काम जास्त असे. कधी कधी रात्रभर जागरण होई व जेवणास अवेळ होई.
- संपूर्ण महाराष्ट्रात बापूसाहेबांनी रोजगार हमीच्या विविध ठिकाणी अचानक दौरे करून रोजगार हमीच्या कामातील अनियमीतता उघडी पाडली व त्यामुळे काही अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्या. निलंबने झाली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन रो. हैं. यो. समितीचे अध्यक्ष वि. स. पागे यांनी बापूसाहेबांच्या वि. स. पागे हेच मनरेगाचेही मूळ जनक खूप तारीफ केली.
- परभणी जिल्हा परिषदेतील खरेदीचा घोटाळा बापूसाहेबांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित करुन सबंधीतास शिक्षा देण्यास भाग पाडले. संबंधित अधिकाऱ्यास पुन्हा मराठवाड्यात पदस्थान देऊ नये, अशी शिक्षा झाली.
- मार्च 1985 च्या पहिल्या आठवड्यात विधीमंडळाची मुदत संपणार असल्याने मंत्रीमंडळाची कारकिर्द संपुष्टात येणार हे जवळपास निश्चित झाले होते. तथापि बापूसाहेबांनी मला तू मुंबईत राहू नको, तुला परवडणारे नाही म्हणून त्यांनी स्वतः तत्कालीन वित्तमंत्री ना. सशीलकुमार शिंदे यांना पत्र लिहून माझी विशेष बाब म्हणून परभणी किंवा औरंगाबाद येथे बदली करावी, अशी विनंती केली व त्या पत्रावर मा, शिंदे साहेबांनी "He should be transfer as a special case and inform me" असा शेरा मारुन मा. संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांना आदेशित केले. अन् माझी बदली औरंगाबाद येथे झाली व दिनांक 10-12-1985 पासून मी औरंगाबाद येथे आलो व स्थायीक झालो ते केवळ बापूसाहेबांमुळेच.
“वि. स. पागे हेच मनरेगाचेही मूळ जनक”
‘मनरेगाचे (दुहेरी) ढोल‘ हा अभ्यासपूर्ण लेख (लोकसत्ता, ४ मार्च) वाचला. त्यातील एका महत्त्वाच्या बाबीची वाचकांना माहिती करून देण्याच्या दृष्टीने हा पत्रप्रपंच.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कायद्याची मूळ कल्पना प्रसिद्ध व्यासंगी गांधीवादी नेते व महाराष्ट्र विधान परिषदेचे भूतपूर्व सभापती कै. वि. स. पागे यांची. महाराष्ट्रात ‘रोजगार हमी योजना’ या नावाने तिचे कायद्यात रूपांतर झाले. गरीब जनतेच्या कल्याणाविषयीची तीव्र तळमळ हा पागे यांच्या कार्याचा आत्मा होता. काम करण्यास तयार असलेला कोणीही उपाशी राहू नये, या तळमळीतून त्यांनी ही योजना तयार केली व ती महाराष्ट्र सरकारने स्वीकारावी, असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांना दीर्घकाळ केला; परंतु योजनेसाठी लागणारा खर्च सरकारला झेपणार नाही, या कारणाने नाईक ती योजना स्वीकारण्यास तयार होईनात. मग योजनेच्या खर्चासाठी छोटासा कर बसवावा, हा उपाय कै. पागे यांनी त्यांना सुचविला. तथापि, त्यानंतरही ही योजना स्वीकारण्याबाबत नाईक यांची चालढकल चालूच राहिली.
मग पागे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावून त्या बैठकीपुढे आपल्या रोजगार हमी योजनेबाबत चर्चा घडवून आणली. या चर्चेत योजनेच्या सर्व साधकबाधक अंगोपांगांचा सविस्तर विचार होऊन तिला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यानंतर तीवर सर्व उपस्थितांच्या सह्या घेऊन आपल्या निवेदनासह मुख्यमंत्री नाईक यांच्याकडे पागे यांनी ती योजना पाठविली. मग मात्र नाईक यांच्याकडून योजनेचा स्वीकार होऊन तिला विधेयकाचे स्वरूप देण्यात आले. या विधेयकावर विधानसभा व विधान परिषद दोन्ही ठिकाणी रीतसर चर्चा होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले व ती सर्व महाराष्ट्रात लागू करण्यात आली.
वरील माहितीवरून कालांतराने केंद्र सरकारच्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’चे मूळ जनक कै. वि. स. पागे हे होते, असे मानण्यास हरकत नसावी.
उल्लेखनीय बाब म्हणजे वरील योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘रोजगार हमी मंडळा’ची स्थापना होऊन पागे त्याचे अध्यक्ष झाले; परंतु त्या पदाचे नाममात्र मानधन म्हणून ते मासिक फक्त एक रुपया घेत असत. त्या पदावर ते जीवनाच्या अखेरीपर्यंत कार्यरत होते.
– वसंत वामन इनामदार, वांद्रे, मुंबई
(मी त्या वेळी विधानमंडळ सचिवालयात ‘सभापतींचा स्वीय साहाय्यक व जनसंपर्काधिकारी’ म्हणून कार्यरत असल्याने वरील घटनाक्रम ‘चक्षुर्वेसत्यम्’ म्हणून मान्य होण्यास प्रत्यवाय नसावा.)
“ राजकारणी नसलेला राजकारणी…! ”
श्री. अनंतराव उमरीकर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
इ.स. 1965 पासूनच्या घटनांचे साक्षीदार
त्या काळात गणेशरावांचे मोठे भाऊ श्री. लिंबाजीराव दुधगांवकर यांची माझी केवळ ओळखच नव्हती तर मी पत्रकार असल्यामुळे नोकझोकही व्हायची. तशी राजकारणातील अनेकांशी व्हायची. तो पावेतो गणेशरावांना मी एक विद्यार्थी म्हणूनच ओळखत होतो. त्या काळात गणेशरावांच्या वाटचालीच्या पाऊलखुणा दिसत नव्हत्या. तसं त्यांच्या घरात राजकारण होतं. त्यामुळे या पाऊलखुणा उमटायला फार काळ लागला नाही. लवकरच कृषी विद्यापीठ संस्थापनेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आणि त्या आंदोलनात आम्ही व्यावसायिक, पत्रकार ओढल्या गेलो. तेव्हा मात्र विद्यार्थी चळवळीत अग्रभागी राहून गणेशरावांनी नेतृत्वाचा झेंडा रोवला.
मराठवाड्यातील नेत्यांना त्यातही परभणीतील नेतेगणांना राजदरबारी फारशी किंमत दिली जात नाही, याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी पक्षत्याग केला आणि शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आणि परभणीत शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडूनही आले; पण तिथेही ते फार काळ टिकू शकले नाहीत. त्यापुढे शरद पवारांच्या जाळ्यात अडकले आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करते झाले. ही त्यांच्या राजकारणातील अंताची सुरुवात होती. वरकरणी हे पक्षबदल लोकांना त्यांच्या अस्थिरतेचं लक्षण वाटत असले तरी मला तसं वाटत नाही.
त्यांचा माझा वैयक्तीक पातळीवर संबंध आला तो परभणीच्या गोरक्षण या मृतप्राय संस्थेच्या शेकडो एकर मालमत्तेची होत असलेल्या लुटमारीच्या प्रश्नावरुन. याबाबत आवाज उठवण्याच्या प्रश्नाला त्यांनी हात घातला आणि नेमकं या कामासाठी त्यांनी एक वकील म्हणून माझ्याशी संपर्क केला आणि तेव्हापासून त्यांच्या स्वभावाचा, एकेक पैलू माझ्या लक्षात यायला लागला. त्यांनी जेव्हा या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांचा राजकारणातील खासदारकीचा काळ संपलेला होता.
बचेंगे तो और भी लढेंगे
गोरक्षण प्रकरणामुळे त्यांच्या आणि माझ्या बऱ्याच वेळा एकत्र बैठका झाल्या. या काळात राजकारणातील सापशिडी व्यवहाराची काहीशी झलक पहायला मिळाली. अॅड. गणेशराव दुधगावकरांनी परभणीतील गोरक्षणाची जमीन वाचविण्यासाठी अतिशय चिकाटीने प्रयत्न केले. या अनुभवावरुन गणेशराव काही शिकले असतील तर ते एवढचं की, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीत राहणं’ एवढचं आपल्या हातात आहे. त्यावर कार्यवाहीची अपेक्षा करणं शहाणपणाचं नाही हेच. तरीही आपण खटपटीत रहायचं. मला वाटतं यातून ते गीतेत म्हटल्याप्रमाणे ‘कर्मने वाधिकारस्ते’ म्हणतात ना ते असावं. म्हणून गणेशराव एवढ्यावर थांबले नाहीत. ते तर दत्ताजी शिंदेच्या परंपरेतले पांडव. तेव्हा ‘बचेंगे तो और भी लढेंगे‘. या कार्यासाठी गणेशरावांनी अनेक नेत्यांना निवेदने दिली.
झालं असं होतं की, कृषी गोसंवर्धनच नव्हे तर मराठवाडा औद्योगिक विकास संस्थेने घेतलेले सारे उपक्रम एकेक करुन अवसायनात निघाले आणि हे कर्ज भागवण्यासाठी परभणी गोसंवर्धन प्रकल्पाची सारी मालमत्ता म्हणजेच शेतजमिनी विक्री करण्याचा घाट घातला. त्यासाठी सरकारी पातळीवरुन मान्यताही मिळवण्यात आली आणि विक्रीसाठी निविदाही मागवण्यात आल्या. नेमकं या वेळेस गणेशरावांनी या प्रश्नाला हात घातला. आम्ही तातडीने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाकडून स्थगनादेश मिळवला. त्या विरुद्ध ‘गोसंवर्धन प्रकल्प’ ही संस्था हायकोर्टात गेली. तिथे त्यांच्या हाती काही आलं नाही. जिल्हा न्यायालयातही स्थगनादेशाविरुद्ध अपील केलं. तिथेही यश मिळालं नाही आणि संस्थेच्या मालमत्तांना संरक्षण मिळवण्यात यश मिळवलं.
विद्यार्थी दशेत असताना कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांना त्यांनी आपल्या संस्थेत महत्त्वाच्या जागेवर बसवलं. त्यांची जात-पात, वशिला वगैरे काहीही न पाहता; पण राजकारणात हे असं चालत नाही. तिथे यशस्वी होण्यासाठी जो कावेबाजपणा पाहिजे, अपमान गिळून गप्प बसण्याची जी वृत्ती पाहिजे ती गणेशरावांची नाही.
त्यांचा स्वभाव म्हणजे स्वच्छ, तळातली खडी स्वच्छ दाखवणाऱ्या नितळ पाण्याप्रमाणे आतबाहेर जे आहे ते स्पष्ट दाखवणारा त्यांचा स्वभाव आहे. राजकारणात या अशा निर्मळ स्वभावाला भोळेपणा म्हणतात. त्यांचं बोट धरुन अनेक जण राजकारणात आले; पण राजकारणात स्थिर होताच त्यांनी गणेशरावांच्या मदतीची शिडी फेकून दिली आणि गणेशरावांच्या विरोधात ते उभे राहिले; पण म्हणतात ना ‘सत्य संकल्पका दाता भगवान’ तसं झालं. त्यांच्या या प्रयत्नांना राजकारण्यांनी साथ दिली नाही तर न्याय संस्था मदतीला आली आणि गोरक्षणच्या जमिनी आता पावेतो तरी सुरक्षित राहिल्या आहेत.
“राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आणि नेतृत्व ठरविणारा नेता”
श्री. मुश्ताक अहमद, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
इ.स. 1980 च्या काळातील साक्षीदार
संपादक, उर्दू दैनिक मुकद्दस, औरंगाबाद
माजी अध्यक्ष, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, औरंगाबाद
मराठवाड्याच्या भूमित जन्मलेले आणि राज्याच्या राजकारणात एकेकाळी आपला ठसा उमटविणारे माजी मंत्री गणेशराव दुधगांवकर यांनी वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. दूधगावकर यांचे पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत त्याचा मला आनंद होत आहे. ते दीर्घकाळापासून समाजकारणात राहिलेली व्यक्ती आहेत.
आज पाठीमागे वळून बघितले तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटलेला दिसतो. त्यांनी निर्माण केलेल्या संस्था ज्याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच परंतु भावी पिढीला ज्ञानाचा मार्ग दाखविला. यातुन अनेक पिढ्या निर्माण झाल्या. अनेकांचे संसार थाटले गेले. शेतीद्वारे समृध्दी आली. मराठवाड्यात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून परभणीचा उल्लेख होतो. त्याचे श्रेय गणेशराव दुधगांवकर यांना द्यावे लागेल. त्यावेळच्या काँग्रेसच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान दुधगावकरांना होते. महाराष्ट्राचे नेतृत्व ठरविणाऱ्यांपैकी एक म्हणजे बापूसाहेब होते.
महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरविण्यात बापूसाहेबांचा सिंहाचा वाटा असायचा. राज्यात बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हटविण्यासाठी बापूसाहेबांनी कंबर कसली होती. अखेर बाबासाहेब भोसले यांना वर्षभरात मुख्यमंत्री पदाव रुन पायउतार व्हावे लागले. मुख्यमंत्री आदिक झाले नाही. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले आणि आदिक यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले होते. त्यावेळी बापूसाहेबांना मंत्रीमंडळात घेण्यात आले होते. अशाप्रकारे राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता.
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून 1980 मध्ये अब्दुल अजिम काँग्रेसकडून निवडून आले होते. मी अजिम यांचा कार्यकर्ता होतो. त्यावेळी दुधगांवकर वसमत मतदारसंघातून विजयी झाले होते. दुधगावकरांचं काँग्रेस हायकमांडजवळ वजन होते. राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मी व इतर पदाधिकारी मिळून दुधगावकरांना भेटलो आणि अब्दुल अजिम यांना आपल्यासोबत मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. दुधगावकरांना बापूसाहेब या टोपण नावाने ओळखले जाते. एकदा त्यांनी शब्द दिला की काम झाले म्हणून समजा. अजिम यांना मंत्री केल्यास मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न धसास लावता येतील, असे त्यांना समजावले. यावर बापूसाहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि त्याप्रमाणे कामही झाले. अब्दुल अजिम बापूसाहेबांसोबत मंत्री झाले !!
अल्पसंख्यांक समुदायाच्या हितासाठी त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. मराठवाड्यातील अल्पसंख्यांकांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. परभणी येथील सर्व विधानसभा मतदारसंघांची उमेदवारी 1985 मध्ये दुधगांवकर यांच्या सांगण्यावरुन देण्यात आली होती. त्यांनी सर्व जणांना निवडून आणल्याने त्यांचे पक्षात वजन अजूनच वाढून गेले होते.
राजकारणात युवकांना संधी देण्यात त्यांचा हातखंडा होता. तरुणांच्या बळावरच त्यांचे राजकारण होते. डॅशिंग नेता म्हणून ते सर्वश्रुत होते. राजकारणात त्यांनी कधी आपल्या फायद्याचा विचार केला नाही. सुरेश वरपूडकर यांना काँग्रेसने विधानसभेत उमेदवारी दिली नाही. तेव्हा बापूसाहेबांनी त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले, असे असताना राज्यातील राजकारणात बापूसाहेबांचे काँग्रेस श्रेष्ठींनी ऐकले नाही. तेव्हा काँग्रेसचे पदाधिकारी असताना त्यांनी सुरेश वरपुडकर यांना सिंगणापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे केले आणि निवडून आणले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यांनी राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी काही केले नाही. कार्यकर्त्यांसाठी सदैव तयार राहायचे आणि प्रसंगी कुठल्याही थरावर जाऊन मदत करायचे.
श्री. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री बनविण्यात बापूसाहेब अग्रेसर होते. मराठवाड्याच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद यावे यासाठी पक्षाच्या स्तरावर त्यांनी भूमिका लावून धरली होती. त्याचा परिपाक श्री. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळाले.
बापूसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत युवकांना उभे केले. अल्पसंख्यांकांचे प्रश्न धसास लावले. सर्व समाज, जात, धर्म, पंथ यांना खऱ्या अर्थाने सोबत घेऊन चालणारा नेता म्हणजे गणेशराव दुधगांवकर आहेत. पंच्याहत्तरीनिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा !
ज्ञानोपासक गणेशराव दुधगांवकर”
श्री. स. सो. खंडाळकर – विशेष प्रतिनिधी, लोकमत, औरंगाबाद
हाफ दाढी… टोकदार मिशावाला… उंचापुरा, धिप्पाड अशा व्यक्तिमत्त्वाचा धनी म्हणजे गणेशराव दुधगांवकर. एखाद्या मराठी चित्रपटात व्हिलनची भूमिका करण्याची संधी मिळाली असती तर त्याला गणेशरावांनी नक्की न्याय दिला असता. हा गमतीचा भाग सोडला तर खऱ्या अर्थानं गणेशराव दुधगांवकर हे ‘हिरो’ आहेत. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी बघता ते शिक्षणमहर्षीच आहेत. सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम पाहता, त्यांना सहकारमहर्षी म्हटल्यास वावगं ठरु नये.
गणेशराव दुधगांवकर हे ज्ञानोपासक आहेत, हे वेगळं सांगायला नको. त्यांनी स्थापन केलेल्या शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांच्या नावांवर सहज नजर टाकली तर याची साक्ष पटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या प्राणप्रिय संस्थांना ‘ज्ञानोपासक’ असं नाव देणं, ही सहज घडणारी गोष्ट नव्हे. ती जाणीवपूर्वक केलेली बोलकी कृती !
‘ज्ञानोपासक’ या शब्दात सारं काही समावलेलं आहे. हा शब्दच अर्थपूर्ण. तो पकडून गणेशराव दुधगांवकर हा जणू छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा अधोरेखित करीत आहेत, हे स्वागतार्ह तर आहेच, तेवढीच अभिनंदनीय व अभिमानास्पद घटना होय. मला तर खरे गणेशराव इथं उठून दिसताहेत. याच ज्ञानोपासक गणेशराव उर्फ बापूसाहेबांचा समाजाला खरा उपयोग झाला असल्याचे दिसून येईल. त्यामुळेच त्यांच्या हातून एक नव्हे कितीतरी पिढ्या घडल्या, हे त्यांचं कार्य अतुलनीयच. म्हणूनच परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी हा सारा परिसर किंबहूना सारा मराठवाडा गणेशराव दुधगांवकर यांच्या कर्तृत्वाचे गीत गायल्याशिवाय राहणार नाही.
ख्यातकीर्त कवी प्रा.फ.मुं. शिंदे, प्रख्यात बासरीवादक दिवंगत प्रा. दत्ता चौगुले आणि शिक्षणाचा कसलाही वारसा नसलेले पण फ.मुं. आणि चौगुले यांचे बोट धरुन त्याकाळी एम.ए. पर्यंत शिकलेले धों. ज. गुरव यांच्या तोंडून गणेशराव दुधगांवकर यांचं नाव सतत येत असे. हेल्पिंग नेचरच्या गणेशराव यांचे किस्से ऐकावयास मिळत असत. परभणीला ही सारी मंडळी शिकायला असताना गणेशरावांचं मोलाचं सहकार्य मिळत गेलं. ही मंडळी, हे सहकार्य विसरतो म्हटलं तरी विसरु शकत नाही.
ते तेवढंच खरं की फाईव्हस्टार हॉटेलमध्येही मिळणार नाही अशा धों. ज. गुरव यांच्या हातच्या खास मराठवाडी आमटीची चर्चा आजही फ.मुं. सर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर, प्रा. शेख शफी सर, प्रा. अजित दळवी सर आणि स्वतः गणेशराव दुधगांवकर तेवढ्याच चवीनं करतात, हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
गणेशराव दुधगांवकर यांनी राजकारणात चमकदार कामगिरी केली नसती तर नवलच. दोन टर्म आमदारकी आणि एक टर्म खासदारकी त्यांच्या वाट्याला आली. ती त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी कारणी लावली.
देशाचं, महाराष्ट्राचं सुसंस्कृत नेतृत्व यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील हे गणेशरावांचे आदर्श. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात तर गणेशरावांना तंत्रशिक्षण, रोजगार हमी योजना व सेवायोजन या खात्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करणार नाही, ते गणेशराव कसले… त्यांनी 45 आयटीआय, 45 टेक्निकल हायस्कूल्स तसेच उदगीर आणि निलंगा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून जणू त्यांनी त्याकाळी मराठवाड्यात तंत्र शिक्षणाची गंगाच खेचून आणली. यात गणेशरावांच्या दूरदृष्टीचा तर प्रत्यय येतोच. पण त्यांचं शिक्षणावरचं अतीव प्रेमही लक्षात येतं. या अर्थानंही बघितल्यास गणेशराव हे ‘ज्ञानोपासक’च ठरतात.
मंत्री असताना औरंगाबादला ते अनेकदा आलेले. काँग्रेसच्या शहागंजातील गांधी भवनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांची भाषणं ऐकण्याची संधी मला लोकमतचा प्रतिनिधी म्हणून मिळालेली. ते मला एक सहृदयी, सामाजिक भान असलेले राजकारणी वाटले.
प्रचंड लोकसंग्रह असलेल्या या नेत्याचा राजकीय प्रवास कसाही झाला असला तरी तो खरा ‘ज्ञानोपासक’ आहे, चांगला माणूस आहे, चांगला मित्र आहे, हे त्यांचा शत्रूही नाकारणार नाही. या ज्ञानोपासकाला उदंड आयुष्य मिळो, त्यांच्या हातून उत्तमोत्तम चांगली कामगिरी घडो, अशा मनापासून आभाळभर शुभेच्छा…!
“मराठवाड्याचे झुंजार नेते मा. गणेशराव दुधगांवकर ”
श्री. के.ई. हरिदास, छत्रपती संभाजीनगर
माझा मूळ पिंड समाजवादी व समतावादी असल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेतृत्वासोबत अंतर ठेवूनच राहत असे. तरीही गणेशरावांसारखे युवक नेते व कार्यकर्ते यांच्याशी मैत्रीसंबंध टिकून राहिले. मराठवाडा विकास आंदोलनामुळे मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळाले. तसेच परभणी येथे कृषी विद्यापीठ स्थापन झाले. त्याशिवाय काही सहकारी साखर कारखाने व सुतगिरण्या पदरात पडल्या. त्यामुळे मला मराठवाड्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी परभणी, जालना, औरंगाबाद, नांदेड व लातूर येथे जिल्हा उपनिबंधक पदावर कार्यरत राहून मराठवाड्यातील नेते व कार्यकर्ते यांच्या सहकार्यानेच्या मनासारखे विकासकाम करता आले. मा. गणेशराव यांचे उल्लेखनीय सहकार्य लागल्यामुळे परभणी जिल्ह्यातील साखर कारखाने, जिल्हा बँक, बाजार समित्या, पणन संस्था यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहता आले. गणेशरावची सडपातळ उंच शरिरयष्टी, टोकदार मिशा व बुल्गानिन टाईप दाढीमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्वाचा ठसा मनावर कायमचा उमटला आहे.
मा. गणेशरावांचे जेष्ठ बंधू लिंबाजीराव हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अनेकवेळा बैठकीनिमित्त त्यांची भेट होत असे. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे आमची घनिष्ठ मैत्री झाली. त्यांचे साहित्य वाचन उल्लेखनीय होते. त्यांची विनोदबुद्धी व हजरजबाबीपणा या सद्गुणांमुळे त्यांचा श्रोत्यांवर प्रभाव पडत असे. त्यांच्या निवासस्थानी आम्ही मित्रमंडळी अनेक मैफिलीत रममाण होत असू, त्या काळात गणेशराव राज्यमंत्रीपद बाजुला ठेवून रसिक, श्रोत्याप्रमाणे सहभागी होत असत.
त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते सुरेश वरपुडकर व बोर्डीकर हे सहकार क्षेत्रात पदाधिकारी होते. त्यांना संपूर्ण सहकार्य केल्यामुळे त्यांची सुद्धा जवळीक निर्माण झाली व नंतरच्या काळात ते सुद्धा राजकीय नेते व काही मंत्री झाले. तरीही त्यांनी मैत्री संबंध कायम ठेवून मला आदराने वागविले !
मध्यंतरी एका उल्लेखनीय घटनेमुळे थोडा फार गोंधळ व गैरसमज झाला होता. एका विधानसभा प्रश्नाच्या अनुषंगाने त्या काळच्या दोन बलाढ्य नेत्यांना त्यांच्या कायदेशीर दोषामुळे चेअरमन पदांवरुन निष्प्रभावित करणे भाग पडले होते.
जिल्हा मध्यवर्ती बँक व एका साखर कारखान्याचे चेअरमन पदावरील नेत्यांना काढण्यामागे कदाचित ना. गणेशरावांचाच हात असू शकतो, अशी चर्चा व बातम्या सुरु झाल्या.
त्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करुन मला खुलासा करण्यासाठी सूचित केल्याप्रमाणे अधिकृत खुलासा केल्यानंतरचे वातावरण निवळले, तोपर्यंत स्वतः गणेशरावांना सुद्धा त्याबाबत माहिती नसावी आणि त्यांनी सुद्धा माझ्याकडे विचारपूसही केली नाही. हा त्यांचा मनाचा मोठेपणा लक्षात घेऊन त्यांच्यासोबत निखळ मैत्री संबंध जपता आले. मा. गणेशरावांनी एका खत कारखान्याची उभारणी करुन सहकारी कृषी उद्योगाला चालना दिली. त्यांच्या या प्रकल्पाबाबत आम्ही इतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मात्र त्याप्रकारचा प्रयोग यशस्वी झाला नाही याची खंत वाटते.
“दिलदार… दिलखुलास… गणेशराव ! “
श्री. सुरेश भटेवरा (पत्रकार), नाशिक
तरुण वयातच विविध संस्थांवर काम करण्याची संधी गणेशरावांना मिळाली. परभणीचा जिल्हा खरेदी विक्री संघ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, राष्ट्रीय स्तरावरची इफको, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फेडरेशन, कृषक भारती सहकारी संस्था अशा विविध संस्थांमध्ये संचालक, चेअरमन अशी विविध पदे त्यांनी भूषवली. सर्वांनाच कल्पना आहे, की या साऱ्या संस्था शेती व शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. गणेशरावांनी अनेक वर्षे या संस्थांमध्ये मनापासून काम केले. त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तारही त्यामुळे परभणीबाहेर राज्याच्या कानाकोपऱ्यात झाला.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी बियाणे व रोपांचा विकास घडवण्यास त्यांनी चालना दिली. राष्ट्रीय स्तरावरच्या नाफेड सहकारी संस्थेचे संचालकपद भूषवतांना, गणेशरावांनी कृषी उत्पादनांचे प्रक्रिया उद्योग, कांद्याची निर्यात, तेलबियांवर प्रक्रिया करणाऱ्या ऑईल मिल्स, इत्यादींचे राष्ट्रीय धोरण ठरण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
औरंगाबादचा भगिरथ सहकारी खत कारखाना, वेंगुर्ला येथील काजू प्रक्रिया उद्योग, चंद्रपूरचा सुगंधा प्रक्रिया उद्योग इत्यादींचा विकास व पुनरुज्जीवन घडवण्यास याच काळात त्यांनी चालना दिली.
“प्रसन्न मुद्रेचे बापूसाहेब !”
श्री. शरद देऊळगावकर, परभणी / छत्रपती संभाजीनगर
“आम्हा सर्वांचेच लाडके.. बापूसाहेब..!”
निखालस, स्पष्टवक्ता, अजातशत्रू असं व्यक्तिमत्त्व
श्री. अरविंद कुलकर्णी, छ. संभाजीनगर
लिंबाजीरावांनी दृढ केलेला पाया, व्यक्तिगत पातळीवर जनसंग्रह वाढवत जाण्याची कला व जातीभेद दुर्लक्षून कार्यकर्ते जोडण्याचा निसर्गदत्त असा पिंड व बिलकूल अजातशत्रू ह्या शब्दात ज्याच वर्णन करता येईल असं हे व्यक्तिमत्त्व. सत्तेत असो वा नसो; पण गणेशरावजी बोलत आहेत म्हटल्यावर शांतपणे लक्ष देऊन ऐकणाऱ्या नेत्यात महाराष्ट्राचे सर्वच मुख्यमंत्री लक्ष देऊन बसलेले आम्ही पाहिलेले आहेत.
प्रादेशिक विकासासंदर्भातला, शिक्षण विषयातला त्यांचा अभ्यास व तत्संबंधाची प्रामाणिकता सर्वमान्यच असायचे. मराठवाड्यातील एक तरुण तर्क अश्या नामाभिधानानं गौरव करावा, असे वाटणाऱ्या नेत्यांपैकी हा एक नेता जनसामान्यांना भावणारा! एक झपाटलेला प्रांजळ व प्रामाणिक कार्यनिष्ठांविषयी आग्रहीपणाने मांडणारा हा कडक पिळदार मिशांचे व्यक्तिमत्त्व लाभलेला नेता. परभणी युवा विश्वाच्या गळ्यातला ताईत होता.
दोनदा एम.एल.ए. चे टर्म व एकदा खासदार म्हणून दिल्लीत ज्याने परभणीचाच नव्हे तर विभागाचेच प्रतिनिधित्व केलं त्या कर्तबगारीच्या काळाचे आम्ही सारेच साक्षीदार होतो. कोण कोणत्या पक्षाचा आहे? त्यापेक्षा खरोखरच ‘विकास’ केंद्रित प्रश्नांवर खंबीरपणे भूमिका घेणारी व्यक्तिमत्त्वे निवडून यावीत, असाच आम्हा सर्वांचा प्रयत्न असायचा. मतभिन्नताही होत्या; पण स्नेहाचा धागा हा अधिक पक्का, शासनाला कामाला जुंपणे, विकासाची कामे रेंगाळायला नकोत, जेवढ्या म्हणून शासकीय सुविधा तत्संबंधाने उपलब्ध करुन घेता येतील. राज्यपातळीवर, केंद्र पातळीवर ते निश्चितपणे प्रभावी मांडणी करायचे त्यामुळे कैक रेंगाळणाऱ्या कल्पनांना चालना मिळाली, हे सत्य आहेच.
मराठवाडा विकास महामंडळाच्या कामकाजातील त्यांचे असलेला योगदान, मा.आ. रायभान जाधवांशी प्रादेशिक विकासा संदर्भातील मतैक्य, अरविंद मिर्रीकर व सुभाष सूर्यवंशी ज्यांच्यावर भुजंगराव कुलकर्णी सारख्या दृष्ट्या अशा प्रशासकाची नजर जो शैक्षणिक क्षेत्राविषयीही एक आगळा अधिकारीच मानला जायचा. त्यांनी घडवलेल्या मनोभूमिकेत वावरणाऱ्या अधिकाऱ्यांसह गणेशरावांनी जे प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न केले ते आजही विभागीय विकासात योगदान करीत आहेत. आर्थिक मर्यादा असतानाही निर्णय राबवण्यातली धडाडी, अडचणीवर मात करु, अशा आत्मविश्वासाचे प्रतिक होती. काही पाऊले दमदार अशी उचलली गेली; पण काही प्रकल्प बदलत्या राजकीय प्रवाहांमुळे अर्धवटच असताना रखडलेल्या पण ‘नियोजन‘ ह्या संदर्भात विचार करता त्या चुकीचे दिशेने टाकलेली पाऊले होते, असे टिकास्त्र त्यांच्या विरोधकांनीही कधी केले नाही.
आ. रायभान जाधवांनी मराठवाडा विकासासंदर्भात जे जे म्हणून प्रकल्प प्रस्तावित केले. तत्संबंधाने केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यात श्री बापूसाहेब कमालीची असे तत्परता दाखवत. शंकररावजीचा तर त्यांना नेहमीच पाठिंबा असे.
CIPET (Central Institute of Plastic Engg. Technology) हा प्रकल्प Indo German Tool Room हा प्रकल्प नव्यानव्या तंत्रप्रणाली मराठवाड्यात येत रहाव्यात, अशी आग्रही भूमिका घेणारा. एम.आय.डी.सी. तील खऱ्या अर्थाने ‘Infrastructural Development सुयोग्य हाताळले गेले. त्यात गणेशरावाचे योगदान लक्षणीयच होते. त्याकाळात मी माझ्या प्लास्टिकच्या उद्योगात असल्याने मला ह्या संदर्भात ते घेत असलेले श्रम त्याची अधिक जाणीव होती, लघुउद्योजकांना साथ देणे त्यात तर त्यांचा पुढाकार असायचा.
IGTR, CIPET, CEDT etc. असे प्रकल्प जे मराठवाडा विकास संदर्भात लक्षणीय टप्पे मानले जातात. त्यात गणेशरावजीचे योगदान कसे नाकारता येईल ?
जगातील सर्वात निष्पक्ष AI म्हणून Grok AI नावाजले गेले आहे…
- 1970 च्या दशकापासून अनेकदा मंत्रिपदे, मुख्यमंत्रीपदे, केंद्रीय मंत्रिपदे सुद्धा भोगलेल्या शरद पवार यांना 85% गुण तसेच
- 1983 पासून मंत्रिपदे भोगलेल्या आणि आठ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या विलासराव देशमुख यांना 65% दिले.
- फक्त तीन वर्षे मंत्रिपद, 2 वेळा आमदार आणि फक्त एकदा खासदार पद लाभलेले ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर हे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि प्रभावशाली नेते होते.
गणेशराव हे असे नेते आहेत ज्यांनी मिळालेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. सगळ्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ग्रोक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने नेता म्हणून त्यांना 85% गुण दिले.
विस्तृत माहिती वाचण्यासाठी खालील लिंक वर नक्की भेट द्या, तुलनात्मक तक्ता पहा –
दिवंगतांच्या भावना वाचण्यासाठी..
सन 1875 पासून सेवा करणाऱ्या परिवाराच्या विस्तृत माहितीसाठी
साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF