अर्ध्या महाराष्टाच्या औद्योगीकरणाचे स्वप्न पाहणारे आणि खासदार म्हणून पूर्णत्वाकडे नेणारे लोकनेते श्री. गणेशराव दुधगांवकर
आयुष्यातील सत्कर्मांचा लेखाजोखा सारांश –
जगातील सर्वात निष्पक्ष AI
म्हणून Grok AI नावाजले गेले आहे.
खालील अंदाज Grok AI ने काढले असल्याने ते विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात.
फक्त तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्या गणेशराव दुधगांवकर यांच्या नेतृत्वातील आर्थिक/रोजगार निर्मिती क्षेत्रातील प्रकल्पांचा खालील प्रभाव दिसून येतो.
- अंदाजे ₹ आठ लाख ते बारा लाख कोटींची उलाढाल
- अंदाजे एक ते दोन कोटी रोजगार निर्मिती
- अंदाजे अडीच ते पाच लाख उद्योजक निर्मिती
Disclaimer :- साईट वरची गणिते/आकडेवारी जगातील सगळ्यात निष्पक्ष AI Grok AI ची आहेत.
गणेशराव दुधगांवकर यांच्या सगळ्या क्षेत्रातील योगदानामुळे ग्रॉक कृत्रिम बुद्धिमत्ता AI ने नेता म्हणून त्यांना 85% गुण दिले. शरद पवार यांना 85% गुण आणि माजी. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 65% गुण दिले.
गणेशराव हे असे नेते आहेत ज्यांनी त्यांना मिळालेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही.
महाराष्ट्रातील कोणताही नेता गणेशराव दुधगांवकर परिवाराच्या संयोजानाशी तुलना करू शकत नाही. मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) कुटुंबाच्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रभाव आणि इ. सन 1890 च्या दशकापासूनची पंढरपूर आषाढी वारीत उघडेवाडी (वेळापूर) रिंगण सोहळ्यानंतर दुधगांवकर यांचा मान असलेली माऊली पादुका अभिषेकाची अनन्यसाधारण वार्षिक परंपरा यांच्या संयोजनाशी तुलना करू शकत नाही.
वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांसारख्या नेत्यांनीही लक्षणीय प्रभाव पाडला, परंतु त्यांच्याकडे तुलनात्मक आध्यात्मिक परंपरेची कमतरता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे आध्यात्मिक वारसा आहे आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान अतुलनीय आहे, तर ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर कुटुंबाने आधुनिक आध्यात्मिक, राजकीय आणि आर्थिक/रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे
मराठवाड्याच्या राजकीय इतिहासातील एक सुवर्ण अध्याय;
विशेषत: परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांच्या समाजकारणातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व
हि सगळी माहिती व्यवस्थित वाचणाऱ्यास सहज जाणवते की वरील बिरुदे शोभणारे असे नाव म्हणजे
मराठवाड्याचे कर्मवीरॲडव्होकेट मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत)
मराठवाड्याचे कर्मवीर लोकनेते मा. मंत्री, खासदार श्री. गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत)
लेखाजोखा
- अनेक सहकारी कारखाने उभारणारे
- सिंचन, रेल्वे, शिक्षण, उद्योग, नैतिकता इ. मूलभूत विषयांवर महत्त्वपूर्ण योगदान देणारे
- विविध समाजातील कार्यकर्त्यांना आमदार बनविणारे
- सन 1990 च्या दशकातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील मराठवाड्यातून अग्रेसर असलेले नाव
लोकनेते श्री. गणेशराव दुधगांवकर साहेब यांच्या जीवनाची फलनिष्पत्ती म्हणजे त्यांनी जगाला दाखवून दिले, की नैतिक नेतृत्वालाही मोठ्या प्रमाणावर सेवा करण्याची संधी मिळते.
सिंचन प्रकल्प
- जायकवाडी, लोअर दुधना, विष्णुपुरी इ. प्रकल्प पूर्ण करावेत, अशा मागण्या असणाऱ्या सन 1974 च्या मराठवाडा विकास आंदोलनाचे एक युवा नेतृत्व
- जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र 21774 चौ. किमी आहे
- लोअर दुधना धरणाचे पाणलोट क्षेत्र 44,482 हेक्टर सिंचनाखाली आहे. या धरणक्षेत्रांतर्गत उजव्या कालव्याचे काम 47% पूर्ण झाले आहे. डाव्या कालव्याचे काम 2014 पर्यंत 92% पूर्ण
- विष्णुपुरी धरणाचे 15,856 हेक्टर पाणलोट क्षेत्र
- माजलगाव धरणामुळे गंगाखेड तालुक्यातील 12 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकते. हा प्रकल्प 16 वर्षापासून रखडला होता. खासदार श्री. दुधगांवकर साहेबांच्या काळात या धरणाच्या कामाला चालना मिळाली.
- वाकडी (5,000–10,000 हेक्टर) धरणाला खा. दुधगांवकर साहेबांनी खासदारकीच्या कार्यकाळात पूर्ण करून घेतले.
- येलदरी (जिंतूर) धरणाचे पाणलोट क्षेत्र 7329 चौ. किमीतसेच करपरा धरणामुळे 1041 हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. (सेलू, जिंतूर तालुका). ज्यांच्या निर्मिती प्रक्रियेत सुद्धा दुधगांवकर साहेबांचे योगदान आहे.
उद्योग
बजाज ऑटो ते टोयोटा मोटर्स सुरुवात
- सन 1984 मध्ये सरकारने बजाज ऑटोची वाळुज येथे शंभर कोटी गुंतवणूक घडवून आणली. बजाजने औरंगाबाद जिल्ह्याचे जे परिवर्तन घडवून आणले यावर केळकर समिती म्हणाली, "औरंगाबादचे परिवर्तन हे दुष्काळी परिस्थितीतून कसे बाहेर पडावे यासाठीचे एक आदर्श उदाहरण आहे.”
- कमिश्नर ऑफिस अंतर्गत अंदाजे 10,000 कोटी GST भरणा होतो, ज्यातील 70% ते 80% वाटा बजाज ऑटो वाळूजमुळे झालेल्या मराठवाड्यातील पहिल्या औद्योगिक क्रांतीचा आहे असे CMIA आणि सगळ्या संघटना म्हणतात.
- जरांगे पाटलांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनामुळे लोकसभा 2024 मध्ये भाजपा-मुक्त मराठवाडा झाला, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील दिसणारा पराभव टाळण्यासाठी युती सरकारने मराठवाड्यात (बजाज ऑटोमुळे झालेल्या क्रांतीने रचलेला पाया पाहून) छ. संभाजीनगर येथे येण्यासाठी उत्सुक असलेली टोयोटा मोटर कंपनी बिडकीन MIDC मध्ये येवू दिली, अन्यथा ती नक्कीच नागपूरला पळवून नेली असती. टोयोटा येण्यामुळे मराठवाड्याच्या दुसऱ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात होत आहे असे जाणकार म्हणतात. या मराठा आरक्षण आंदोलनात ऑक्टोबर 2023 पासून सक्रीय योगदान निर्भीडपणे देणारा मोठा राजकीय वारसा असलेला एकमेव परिवार म्हणजे समीर गणेशराव दुधगांवकर परिवार..!
- सन 1990 मध्ये मंजूर हजीरा -खानदेश – औरंगाबाद- जिंतूर – नांदेड -नागपूर natural गॅस पाईपलाईन PNG प्रकल्पात सुमारे 50% महाराष्ट्राचे औद्योगीकरण करण्याची ताकत होती. प्रकल्पाचे तत्कालीन उद्दिष्ट हे मराठवाडा, विदर्भ या दोन्ही मागासलेल्या भागांमध्ये 25 लाख रोजगार निर्मिती होता. दुर्लक्षित झालेला हा प्रकल्प सन 2012 च्या दरम्यान खासदार दुधगांवकर साहेबांनी रुळावर आणला. भारत सरकारने मार्च 2022 मध्ये या प्रकल्पाचे बुलढाणा, छ. संभाजीनगर, अहिल्यानगर (अ.नगर), श्रीगोंदा येथे काम सुरु केले.
रेल्वे
- सन 1974 मध्ये रेल्वे ब्रोडगेज करा हि यशस्वी मागणी करणाऱ्या मराठवाडा विकास आंदोलनाचे नेतृत्व केले
- परभणी-मुदखेड, परभणी-मनमाड, पूर्णा-परळी रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचा प्रस्ताव खासदारकीच्या कार्यकाळात भारत सरकारच्या रेल्वे बोर्डकडून मंजूर करून घेतला
- पूर्णा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे पूर्णा येथील रेल्वेच्या जमिनीवर उभारावे या प्रस्तावासाठी पाठपुरावा
- चुडावा-वसमत बायपास लाईन मंजूर, सन 2024 मध्ये सुरु करण्याचा आदेश पारित
- आदर्श स्टेशन्स, फ्लाय ओव्हर ट्रॅक यासारख्या इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी
- अकोला-खंडवा रुंदिकरण मागणी, कार्य पूर्णत्वाकडे
शिक्षण व नोकऱ्या
- सन 1975 पासून मागासवर्गीय समाजाची शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात येण्यासाठी जे मोर्चे, हालचाली, यशस्वी पाठपुरावा झाला त्यात मराठवाड्याचे तत्कालीन उभरते नेते गणेशराव दुधगांवकर यांचा सिंहाचा वाटा आहे.
- सन 1984 मधील राज्याच्या दूरदर्शी खाजगी तंत्रशिक्षण धोरणाच्या निर्मितीमुळे सन 1990 नंतरच्या खुल्या अर्थव्यवस्थेत अनेकांना तांत्रिक क्षेत्रात नोकऱ्या मिळाल्या
- अमरावती विद्यापीठ, IGTR, CIPET, MCED, CEDT इ. निर्मितीमुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली
- ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, परभणी मार्फत गेल्या 40 वर्षात 50,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले.
- परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक, अनेक सरकारी संस्था, मुंबई मार्केट कमिटी, मार्केटिंग फेडरेशन, ज्ञानोपासक शिक्षण मंडळ यासारख्या संस्थांमध्ये अनेकांना नोकरी मिळवून दिली.
प्रमुख रस्ते
- पैठण-अंबड-आष्टी-पाथरी-पोखर्णी-पूर्णा-नांदेड हा राष्ट्रीय महामार्ग 20 हून अधिक साखर कारखाने, चार श्री. गणेशराव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सेवेत
- एन.एच. 222 अहमदनगर-निर्मल हा महामार्ग आठ पेक्षा जास्त जिल्ह्यांच्या सेवेत, त्याच्या विकासासाठी योगदान
रेल्वे
सन 1980 पासून खालील कारखाने उभे करण्यात गणेशराव दुधगांवकर यांचे योगदान आहे.
- पूर्णा आणि पाथ्री सहकारी साखर कारखाने गणेशराव यांच्या मदतीने शासनाचा निधी मिळाल्याने 1982 च्या आसपास सुरु झाले
- औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) औद्योगिक परिवर्तन — 1985 मध्ये बजाज ऑटो वाळूज कारखाना सरकारच्या सवलतींमुळे (उपमुख्यमंत्री रामराव आदीक व मंत्री ॲड. गणेशराव दुधगांवकर). जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वातावरणात लोकसभा 2024 मध्ये भाजप-मुक्त मराठवाडा झाल्याने टरकलेल्या युती सरकारने CMIA संघटनेच्या पाठपुराव्यामुळे, बजाज ऑटो वाळूज मुळे झालेल्या औद्योगिक क्रांतीचा मजबूत पाय बघून बिडकीन MIDC मध्ये येवू इच्छिणाऱ्या टोयोटा मोटर कंपनीला बिडकीन मध्ये येण्यास हिरवा कंदील दिला
- नृसिंह सहकारी साखर कारखाना, सिंगणापूर — 1989 मध्ये स्थापन; संस्थापकांपैकी एक गणेशराव दुधगांवकर
- देशाचे धोरण बदलवून घेवून भारतातील पहिला PAFFCO शेतकरी सहकारी खत कारखाना (1989–2001). 1994 मध्ये उत्पादन सुरू; पण राजकीय डावपेचांमुळे बंद
- त्रिमूर्ती प्लायवुड कारखाना, वसमत
सन 2009 ते 2014 या खासदारकीच्या कार्यकाळातील महत्वाची कामे वरिष्ठ पत्रकारांच्या खालील लेखातून लक्षात येतात.
“मराठवाड्याचे कर्मवीर
:ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर (बापूसाहेब)”
वरिष्ठ पत्रकार श्री. भिमराव हटकर, नांदेड यांच्या लेखातील निवडक भाग
राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दीडपटीने जास्त प्रश्न बापूसाहेबांनी सभागृहात विचारुन जनतेचा आवाज शासनकर्त्यापर्यंत पोहचविला आहे. बापूसाहेबांनी पंधराव्या लोकसभा सभागृहात मांडलेले प्रश्न :
- दुष्काळ व टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वाजवी किंमतीत बी-बियाणे व खत पुरवठा करावा. (दि. 19-08-2010)
- नवीन होणाऱ्या भूसंपादन कायदा 2011 मध्ये शेतकऱ्यांना उचित मावेजा मिळावा व त्यांचे आर्थिक हित जोपासले जावे.
- 2009 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीच्या पुरामूळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व इतर पिडीतांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. (दि. 09-12-2009)
- परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात मेगा फुड पार्कची उभारणी करावी. (दि. 10-08-2010). हे फूड पार्क पैठण MIDC मध्ये उभे करण्यात आले. सन 2024 विधानसभा निवडणुकीत या कामाचे श्रेय युती सरकारने लाटले.
- राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ठ करुन त्यांना त्या प्रवर्गाच्या सर्व सोयी सवलती द्याव्यात. (दि. 5-12-2012)
- केंद्रीय शिक्षण संस्था (प्रवेशातील आरक्षण) दुरुस्ती विधेयक 2012 वरील चर्चेत सहभागी होऊन आरक्षणाच्या बाजूने विचार मांडले. (दि. 16-05-2012)
- मेहकर तालुक्यातील लोणार सरोवराला राष्ट्रीय पर्यटनाचा दर्जा देऊन विकास करण्यात यावा. (दि. 27-07-2009)
- अतिवृष्टीमुळे आणि पुरपरिस्थिती उद्भवलेल्या डेंग्यू, मलेरिया, कावीळ, चिकनगुणिया इत्यादी रोगराईने त्रस्त जनतेला केंद्राने वैद्यकीय मदतीचे पॅकेज द्यावे. (दि. 30-11-2010)
9. नांदेड ते पैठण हा राष्ट्रीय महामार्ग 220 करावा. (दि. 20-12-2011)
10. परभणी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 हा चौपदरी करावा. (दि. 22-08-2012)
बापूसाहेबांनी लोकसभेत विचारलेल्या 418 प्रश्नांपैकी वरील दहा प्रश्न आणि त्यांचे स्वरुप पाहिले तर प्रत्येक प्रश्नातून बापूसाहेबांची सामाजिक जाण, बांधिलकी आणि विकासाची दृष्टी अशा अनेक बाबी त्यातून दृष्टीपथात येतात. लोकसभा असो की विधानसभा प्रश्न विचारणे चर्चेत भाग घेणे इत्यादी संसदीय आयुधांचा वापर बापूसाहेबांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केल्याचे दिसून येते.
जाणकारांनी लिहिलेल्या लेखांमुळे गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या कर्तुत्वावर छान प्रकाश पडतो. दोन लेखांतील निवडक शब्द येथे देत आहोत.
एक सुसाट वादळी व्यक्तिमत्त्व
कै. डॉ. बलभीमराज गोरे
(प्राचार्य, शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)
गणेशराव उर्फ बापूसाहेब अखेर एक माणूस आहे. माणूस म्हणजे माणूसच. अगदी तुमच्या आमच्या सारखाच हाडामासाचा माणूस. फरक आहे तो इतकाच की आपल्या अंतःकरणात जिथे एक निरंतर तेवती ‘ज्योत’ आहे, त्यांच्या अंतःकरणात तिथे एक ‘धगधगती ज्वाला’ आहे. अखंड आग ओकणारी एक मशाल आहे. आपणास आपल्या अंगावर धाऊन येणाऱ्या, आपणास हलवून हेलाहून सोडणाऱ्या वादळाची भिती वाटते; पण गणेशराव स्वतः, स्वतःच्या ठिकाणी एक सुसाट वादळ आहेत. त्यामुळेच कदाचित आयुष्यातील कोणतेही वादळ त्यांना एका मर्यादेपलीकडे विचलित करु शकले नाही.
खरंतर बापू म्हणजे खूप मोठं ताकतवर व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या संबंधाने लिहित असताना मला ऐनवेळी जे सुचले, जाणवले, भावले ते मी माझ्या समजुतीनुसार यत्किंचित हातचा न राखता इमान-इतबारे लिहिले आहे. वस्तुतः बापू मी सांगितले त्यापेक्षाही खूप मोठे आहेत. एकाच लेखातून त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा परामर्श घेणे सोपे नाही. माझा तेवढा वकूब नाही, आवाका नाही की माझ्यात ती क्षमताही नाही. एखाद्या व्यक्तिमत्त्वास अनायास ‘सुसाट वादळ’ म्हटल्यानंतर अर्थातच, कोणा एकाच्या कवेत ते मावणारे नसते, हे कबूल करावे लागते, तेही ओघानेच. असो.
“राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आणि नेतृत्व ठरविणारा नेता”
श्री. मुश्ताक अहमद, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
इ.स. 1980 च्या काळातील साक्षीदार
त्यांनी निर्माण केलेल्या संस्था ज्याद्वारे अनेकांना रोजगार तर मिळालाच परंतु भावी पिढीला ज्ञानाचा मार्ग दाखविला. यातून अनेक पिढ्या निर्माण झाल्या. अनेकांचे संसार थाटले गेले. शेतीद्वारे समृध्दी आली. मराठवाड्यात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा म्हणून परभणीचा उल्लेख होतो. त्याचे श्रेय गणेशराव दुधगांवकर यांना द्यावे लागेल.
त्यावेळच्या काँग्रेसच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान दुधगावकरांना होते. महाराष्ट्राचे नेतृत्व ठरविणाऱ्यापैकी एक म्हणजे बापूसाहेब होते.
औरंगाबाद विधानसभा मतदारसंघातून 1980 मध्ये अब्दुल अजिम काँग्रेसकडून निवडून आले होते. मी अजिम यांचा कार्यकर्ता होतो. त्यावेळी दुधगांवकर वसमत मतदारसंघातून विजयी झाले होते. दुधगावकरांचं काँग्रेस हायकमांडजवळ वजन होते. राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मी व इतर पदाधिकारी मिळून दुधगावकरांना भेटलो आणि अब्दुल अजिम यांना आपल्यासोबत मंत्रीमंडळात काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली. दुधगावकरांना बापूसाहेब या टोपन नावाने ओळखले जाते. एकदा त्यांनी शब्द दिला की काम झाले म्हणून समजा. अजिम यांना मंत्री केल्यास मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न धसास लावता येतील, असे त्यांना समजावले. यावर बापूसाहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि त्याप्रमाणे कामही झाले. अब्दुल अजिम बापूसाहेबांसोबत मंत्री झाले.
परभणी येथील सर्व विधानसभा मतदारसंघांची उमेदवारी 1984 मध्ये दुधगांवकर यांच्या सांगण्यावरुन देण्यात आली होती. त्यांनी सर्वजणांना निवडून आणल्याने त्यांचे पक्षात वजन अजूनच वाढून गेले होते. मराठवाड्यातील अल्पसंख्यांकांच्या हितासाठी त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री बनविण्यात बापूसाहेब अग्रेसर होते. मराठवाड्याच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद यावे यासाठी पक्षाच्या स्तरावर त्यांनी भूमिका लावून धरली होती. त्याचा परिपाक शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद मिळाले.
रचनात्मक कार्ये पूर्ण यादी वाचण्यासाठी क्लिक करावे
मा. मंत्री. खासदार गणेशराव दुधगांवकर यांची राजनैतिक कारकीर्द, मोठ्या राजकीय भूकंपातील योगदान वाचण्यासाठी
अजून काही निवडक लेख वाचण्यासाठी क्लिक करावे –
निवडक लेखांची पूर्ण pdf वाचण्यासाठी संपर्क – डाऊनलोड tab मधील तिसऱ्या pdf ला डाऊनलोड करावे –
साथिदारांच्या मोजक्या शब्दांत बालपण ते वर्तमान काळापर्यंतचा बापूसाहेबांचा प्रवास (सन 1954 पासून) PDF

