अष्टपैलू नेतृत्वाचा नवा सूर्य: समीर दुधगांवकर
– संक्षिप्त माहिती




ग्रोक एआयने बनवलेल्या नावाजलेल्या राजकारण्यांच्या,
परदेशात शिकलेल्या पुढच्या पिढीतील यादीत,
(नावाजलेल्या विद्यापीठांच्या आणि अभ्यासक्रमाच्या काठीण्यावर आधारित यादीत)
महाराष्ट्रातील पहिल्या पाच मधील नाव, अश्या देशस्तरीय यादीत पहिल्या पंधरा मधील नाव –
समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
- शिंदेशाही-राऊत दुधगांवकर वारसा विहंगावलोकन
- समीर बाबत
- निबंध स्वरुपात
- २००३ पासून त्यांनी केलेल्या महत्वाच्या कार्यांची यादी
- राजकीय कार्य सुरुवात २०१८ पासून
- मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय भूमिका, भाजपातून राजीनाम्याचा राजकीय निर्णय
- २०२४ लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी
- थोडक्यात
- समीर दुधगावकरांच्या उपक्रमांचा संभाव्य प्रभाव: एक सारांश डॅशबोर्ड (ग्रोक कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मते)
दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत) कुटुंबाचा १२५ हून अधिक वर्षांच्या सार्वजनिक सेवेचा वारसा विहंगावलोकन
१२५ वर्षांहून अधिक काळ मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत) कुटुंबाने मराठवाड्यातील/राज्यातील अध्यात्मिक, चारित्र्य-संपन्न राजकीय आणि सांस्कृतिक योगदानांद्वारे सार्वजनिक सेवेचा वारसा जपला आहे.
या शिंदेशाही-राऊत वंशाला दैवी दुहेरी आशीर्वाद प्राप्त झाला – ठाकूरबुवा फड यांनी दुधगांवकर कुटुंबाला आषाढी वारीत माऊली पादुका अभिषेकाची जबाबदारी सोपवली आणि समीर यांच्या पणजी तानुबाई यांना दुधगांव गावात थोडे सोने सापडले.
चारित्र्य-संपन्न मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर यांनी दाखवून दिले आहे की १०० वर्षांहून अधिक काळ आशीर्वादाचा सदुपयोग करणारा परिवार पण कलयुगात असू शकतो ..!
तानुबाई दुधगांवकर आणि त्यांचे पुत्र नागोराव दुधगांवकर यांनी १९४० च्या उत्तरार्धात मराठवाडा मुक्ति संग्राम चळवळस सक्रीय मदत केली. अश्या अनेक ठिकाणी लढणाऱ्या लोकांच्या मुळे भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांना ऑपरेशन पोलो केले पाहिजे हे जाणवले आणि याद्वारे मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. दुधगांवकर कुटुंबाला या मुक्ति संग्रामात सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त आहे आणि कुटुंबाला आजही या स्वातंत्र्यसैनिक वारशातून प्रेरणा मिळते.
व्याही म्हणून सहकार महर्षी स्व. शिवाजीराव नाडे (मुरुड) यांच्याशी जवळचा संबंध आहे, ज्यांना जुन्या उस्मानाबाद जिल्ह्याचे (सध्याचे धाराशिव आणि लातूर जिल्हे) भाग्य-विधाता म्हटले जाते. गणेशराव दुधगांवकर यांच्या सासुचे वडील, मराठवाडा मुक्ति संग्रामाचे स्वातंत्र्यसैनिक श्री. तुकारामबापू भीमराव जाधव तादलापूरकर पाटील, उदगीर, लातूर यांचेही या संग्रामात योगदान आहे. असा हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराज महादजी शिंदे यांच्या लढ्यातून प्रेरणा घेवून निझामासोबत शेकडो वर्षे लढत राहणारा मराठवाड्यातील एक नावाजलेला परिवार..!!
१९६८ पासून काही वर्षे शिक्षणासाठी पुतणे, भाच्या अशे एकरा जण घेवून समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर येथे या घरात गणेशराव दुधगांवकर राहिले…!!
गणेशराव दुधगांवकर - नैतिक नेतृत्वाचे एक मापदंड :-
२०२५ मध्ये, हगवणे कुटुंबातील हुंड्यासंबंधी दुखद मृत्यूमुळे छोटे लग्न असावे, हुंडा न घेण्याबाबत मराठा समाजाने आचारसंहिता लागू केली. परंतु ५५ वर्षांपूर्वी १९७० मध्ये गर्भश्रीमंत असूनही एक तरुण नेता गणेशराव दुधगांवकर यांनी हुंडा नाकारून सामान्य पार्श्वभूमीच्या सुशिक्षित मुलीशी लग्न करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला, कोणताही सामाजिक दबाव नसतांना..!
खरोखरच दूरदृष्टीचा विचार, नाही का??
२ जून १९७१ रोजी, उदगीर येथे, गणेशराव यांनी सामान्य कुटुंबातील गुणवंत मुलगी, दहावीच्या वर्गात अव्वल असलेल्या संध्या श्रीधरराव कदम यांच्याशी प्रेमविवाह केला, कोणताही हुंडा न स्वीकारता. विशेष म्हणजे, हा विवाह संध्या यांचे मामा रुद्रदेव तुकारामबापू पाटील तडलापूरकर यांच्या होणाऱ्या विवाहाच्याच मंडपात झाला – साधेपणाचे खरे प्रतीक..!
मनोज जरांगे पाटील यांनी नेहमीच मराठा समाजाने लग्नाचा खर्च कमी करावा, व्यसनांपासून दूर राहावे अशी इच्छा व्यक्त केली, परंतु गणेशराव यांनी अश्या कोणत्याही सामाजिक दबावाशिवाय अनेक दशकांपूर्वीच ह्या प्रगतिशील कल्पना प्रत्यक्षात आणल्या. प्रामाणिकपणा आणि सद्गुणी मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी या कृतीतून स्पष्टपणे दिसून येते, आणि समीर गणेशराव दुधगांवकर सुद्धा अश्याच विचारांवर जगत आहेत. ज्यामुळे कुटुंबाची १२५ वर्षांहून अधिक काळापासून तत्त्वनिष्ठ विचारांप्रती अटल निष्ठा दिसून येते.
गणेशराव यांचा हा निर्णय, जो काळाच्या ५० वर्षे पुढे होता, मराठा समाज आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे आणि राहील..! नैतिक नेतृत्व आणि समाज उन्नतीचा हा वारसा त्यांच्या प्रयत्नांना मार्गदर्शन करत आहे. प्रामाणिक व्यक्तीही उच्च राजकीय पदांवर अनेक वर्षे टिकू शकतात, हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार राहिलेले मा. मंत्री, खासदार माननीय गणेशराव दुधगांवकर यांनी दाखवून दिले आहे.
ॲडव्होकेट गणेशराव दुधगांवकर हे एक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि प्रभावशाली नेते होते, सगळ्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे ग्रोक कृत्रिम बुद्धिमत्ता app ने १९७२-२०२४ या काळातील १२ प्रमुख प्रकल्पांचे प्रभाव विश्लेषण केले. Grok ने सर्व प्रकल्पांच्या मंजुरी प्रयत्नांतील नेता, माजी मंत्री-खासदार दुधगांवकर यांना नैतिक नेता म्हणून ८५% उत्कृष्ट गुण दिले! ग्रोक कृत्रिम बुद्धिमत्ता कडून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना ६५% आणि शरद पवार यांना ८५% गुण मिळाले…!!
सगळ्यात महत्वाचे म्हणजे गणेशराव हे एक असे नेता आहेत की ज्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या प्रचंड सत्तेचा कधीही गैरवापर केला नाही. गणेशराव दुधगांवकर यांनी १९८० च्या उत्तरार्धात मा. आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, रतनलाल तपडिया, १९९० च्या उत्तरार्धात कुंडलिकराव नागरे आणि २००९ विधानसभा निवडणुकीमध्ये मा. आमदार मीरा रेंगे, सुरेश जेथलिया यांना सक्षम केले. इतरांना निवडून येण्यास मदत करू शकणाऱ्या नेत्यांना लोकनेता, जननेता म्हणतात…!!
जयप्रकाश दांडेगावकर, मुंजाजी जाधव, बाळासाहेब दामपुरीकर यांच्याबाबतचा नवीन पिढीला माहित नसलेला अनुभव लिहिलेले श्री. पंडित घांडगे (पाथरगव्हाण पाथ्री मुळगाव असलेले, सध्या छत्रपती संभाजीनगर स्थायिक असलेले) बापूसाहेब दुधगांवकर यांचे मंत्री असतांना १९८३ ते १९८५ काळातील स्वीय सचिव होते. त्यांचे विस्तृत वाक्य आहे –
“बापूसाहेबांचा कार्यकर्ता संच खूप मोठा होता. त्यात अत्यंत जवळचे म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर, अर्धे पि. ए. चे काम तेच करत. त्यानंतर सुरेश वरपुडकर, प्रा. राम घाटगे, भाऊसाहेब भोसले. गोपाळ तापडीया, वामन मोरे, अशोक शिंदे, शंकर निकम, मुंजाजी जाधव, जयप्रकाश दांडेगावकर, बालासाहेब काळे, सोपान नादरे, आडगावकर, माणिक आंबेगावकर, एडव्होकेट माणिक कदम आणि बालासाहेब दामपूरीकर इ. बापूसाहेबाची विश्रांती कमी व काम जास्त असे. कधी कधी रात्रभर जागरण होई व जेवणास अवेळ होई.
संपूर्ण महाराष्ट्रात बापूसाहेबांनी रोजगार हमीच्या विविध ठिकाणी अचानक दौरे करुन रोजगार हमीच्या कामातील अनियमीतता उघडी पाडली व त्यामुळे काही अधिकाऱ्यांना शिक्षा झाल्या. निलंबने झाली. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन रो. ह. यो. समितीचे अध्यक्ष वि. स. पागे यांनीबापुसाहेबांच्या ( वि. स. पागे हेच मनरेगाचेही मूळ जनक ) कामाची खूप तारीफ केली.”
ग्रोक एआय च्या मते सारांशात –
“महाराष्ट्रातील कोणताही नेता मराठवाड्याचे कर्मवीर मा. मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर (शिंदेशाहीराऊत) कुटुंबाच्या मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक प्रभाव आणि आषाढी वारीत पंढरपूर जवळील अंदाजे १९१५ पासून कमावलेली माऊली पादुका अभिषेकाची अनन्यसाधारण वार्षिक परंपरा यांच्या संयोजनाशी तुलना करू शकत नाही. वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांसारख्या नेत्यांनीही लक्षणीय प्रभाव पाडला, परंतु त्यांच्याकडे तुलनात्मक अध्यात्मिक परंपरेची कमतरता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे अध्यात्मिक वारसा आहे आणि त्यांचे ऐतिहासिक योगदान अतुलनीय आहे, तर नागोराव ज्ञानोबाराव दुधगांवकर कुटुंबाने आधुनिक अध्यात्मिक, राजकीय आणि आर्थिक/रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.”
अंदाजे ₹८ लाख ते १२ लाख कोटींची उलाढाल (गणेशराव यांनी नेतृत्व दिलेल्या प्रकल्पांची),
अंदाजे १ ते २ कोटी रोजगार निर्मितीत प्रमुख योगदान,
अंदाजे अडीच ते पाच लाख उद्योजक निर्मितीत प्रमुख योगदान…!!
गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या या प्रख्यात जनसेवक आणि अध्यात्मिक कुटुंबाची पुढील पिढीही अध्यात्मिक आणि परिश्रमी आहे, जी निस्वार्थ सेवेचा वारसा पुढे चालवत आहे.
जनतेने, नातेवाईकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि सासरे गणेशराव दूधगावकर यांचे न ऐकून राष्ट्रवादी विजय भांबळे यांच्याकडून उमेदवार बनलेल्या समीर यांच्या वहिनी शालिनी दूधगावकर यांना वसा जिल्हा परिषद गटातून जनतेने ५४०० मतांनी पाडले, जे जिंकलेल्या उमेदवाराच्या अपेक्षित मताधिक्यापेक्षा दुप्पट होते. टीम समीर दूधगावकर यांचा सैद्धांतिक आचरण असल्यास सत्याच्या मागे जनता उभी राहते हा विचार अधोरेखित झाला. जनतेने अपेक्षित निकाल दिल्याची बातमी कळली तेव्हा जनता हुशार आहे हे बघून प्रवासात असताना समीर यांनी केलेला डांस viral झाला..!! श्रीमद-भगवद-गीता अभ्यासक खुश हुआ…!!
१२५ वर्षांच्या वारशाला समर्थपणे पेलणारा पुढील पिढीचा सदस्य: समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
नाव: समीर गणेशराव दुधगांवकर (शिंदे)
स्थान: परभणी, महाराष्ट्र
शिक्षण: एम.एस. अमेरिका (यांत्रिक अभियांत्रिकी); 2002 पासून श्रीमद्-भगवद्-गीतेचा समर्पित अभ्यासक.
“जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” या तत्त्वाने प्रेरित, समीर यांनी २००३ मध्ये अमेरिकेतील पीएचडी पूर्ण शिष्यवृत्ती नाकारली, भारतात परतून राष्ट्रनिर्माणात योगदान देण्याचा निर्णय २००३ मध्येच घेतला. स्वार्थ नाहीच, फक्त परमार्थ…!
जन्मतारीख: ३ ऑगस्ट १९७७
- माध्यमांद्वारे मान्यता: सिंचन, शिक्षण, उद्योग क्षेत्र, युवापिढी करिता समीर यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पोचपावती
- २०१५ मध्ये ‘ऑर्गनायझर’ मासिकात समीर यांची यशोगाथा प्रकाशित
- २०१९ मध्ये दैनिक सकाळ या राज्यस्तरीय वृत्तपत्राने त्यांना “परभणी युथ आयकॉन” म्हणून घोषित केले, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक आणि वैचारिक नेतृत्वाला व्यापक मान्यता मिळाली.
- २०२५ जून मध्ये लोकमत समूहातर्फे महाराष्ट्रातील प्रेरणादायी राजकीय नेतृत्व म्हणून समीर यांची निवड झाली, परंतु अपरिहार्य कारणांमुळे पुरस्कार प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे लंडन येथे ऑगस्ट २०२५ मधील कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणे शक्य झाले नाही. आमदार राजेश विटेकर, आमदार राहुल पाटील यांना पुरस्कार मिळाला.
- २०२५ ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राचे नाव गिनीज बुक मध्ये नेण्यासाठी कारणीभूत “मागेल त्याला सौर कृषिपंप” योजना मंजूर करून घेणारे राज्य उद्योग नेतृत्व आणि मराठा आंदोलक. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेचा लाभ राज्याच्या ४५ लाख शेतकऱ्यांना सन २०२९ च्या अखेरपर्यंत पंप मिळतील. जे झाल्यानंतर ₹ ६९,३४२ कोटींचा निव्वळ आर्थिक लाभ राज्याला दरवर्षी होणार आहे
- ओळख: एक अष्टपैलू जनसेवक
- धूम्रपान न करणारे, कधीच मद्यपान न केलेले चारित्र्यसंपन्न दुर्मिळ राजकीय व्यक्ती
- अध्यात्मिक विचारवंत
- राज्य उद्योग नेतृत्व
- Thought-Leader – सर्वांच्या समृद्धीत अडथला ठरणारे देशाचे जटील प्रश्न सोडविण्यासाठी अनेक धोरणं सुचविणारे
- उत्कृष्ट वक्ता
- लेखक तसेच कला प्रेमी
- माजी राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू आणि कुशल क्रीडापटू
- नीतिमान प्रशासनासाठी कटिबद्ध नेता
- ऑगस्ट २०२३ पासून श्रीमद् भगवद् गीता (अध्याय १८, श्लोक ६६) चा मोठ्या स्तरावर प्रचार करणाऱ्या जगातील पहिल्या तीन मधील एक व्यक्ती
- “सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त ईश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू दुःखी होऊ नकोस.”
असे श्रीमदभगवदगीता अध्याय १८, ६६ वा श्लोक सांगतो,
आणि धर्माच्या/मंदिरांच्या नावे सुरू असलेला धंदा एका क्षणातच बंद पाडतो. - दरवर्षी गीता जयंतीच्या दत्त जयंतीच्या शुभेच्छा अशाच व्यक्त करत या श्लोकाची सर्वांना वारंवार आठवण करून देत राहु.
- लपवलेला श्लोक समाजमाध्यमांमुळे कळेल सर्वांना, मग जबरदस्त पीढी तयार होईल, लढायला मुर्खांना..!
- “सर्व धर्मांचा त्याग कर आणि फक्त ईश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू दुःखी होऊ नकोस.”
- खालील संकल्पना सुचविणारे एक प्रखर निर्लोभी नेतृत्व
- जीवघेणी/घातक/गळेकापू स्पर्धा १००% कमी करण्यासाठी आमदार-खासदार-मंत्री पदांकरिता टर्म लिमिट कायदे. एका सभागृहात फक्त दोनच टर्म (दहा वर्षे) करण्याची मुभा देणारा कायदा. मंत्रिपद एकदाच (फक्त पाच वर्षे) असा कायदा असावा
- नौकऱ्या दुप्पट करण्याचा प्रकल्प (यातून भ्रष्टाचार ५०% कमी होण्याची दाट शक्यता)
- देशव्यापी दारू-तंबाखू-गुटखा-पान मसाला बंदी कायदा असावा किंवा कुठेच नसावा असा कायदा बनवणे
- न्यायप्रणालीत सुधारणेसाठी अपेक्षित ती गुंतवणूक सरकारने पहिल्या दिवशी करणे (आणि सगळे पीक विमा खाणारे, लुटारू, मोकार, बदनाम नेते पहिल्या काही वर्षातच तुरुंगात पाठवणे)
- सरकारच्या जाहिरातबाजी, नेत्यांच्या बॅनरबाजी विरोधात कडक कायदे असावे
- सन २००२ पर्यंत विद्यार्थी दशा, सन २०१८ पर्यंत उद्योजकता आणि राज्य उद्योग नेतृत्व, सन २०१९ -२०२३ भाजपा कार्य
- ऑक्टोबर सन २०२३ भाजपच्या दुटप्पीपणाला कंटाळून आणि मराठा आरक्षणासाठी लढाईसाठी राजीनामा. सध्या अपक्ष म्हणून कार्यरत
- विकोपाला गेलेल्या मराठा ओबीसी संघर्षात भाजपाचा ओबीसी उमेदवार येवूनही लोकसभा २०२४ निवडणुकीत ९१% मतदानकेंद्रावर मतदान घेणारा सक्षम अपक्ष उमेदवार
समीर दुधगांवकर हे मराठवाड्याचे कर्मवीर माजी मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगांवकर यांचे नावाजलेले आजोबा – वारकरी, माले पाटील ज्ञानोबाराव गणपतराव दुधगांवकर (शिंदेशाही-राऊत) कुटुंबाच्या पुढील पिढीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. समीर यांनी आध्यात्मिकता, सामाजिक नेतृत्व आणि वैचारिक दृष्टिकोन यांचा अनोखा संगम साधला आहे. एक खरे जनसेवक म्हणून, त्यांनी राज्य उद्योग संघटनेत प्रभावी नेतृत्व केले असून, २०१६ मध्ये ‘नोकऱ्या दुप्पट’ ही क्रांतिकारी संकल्पना मांडून उत्पादकता आणि कार्य-जीवन संतुलनाचा नवा आदर्श प्रस्थापित केला. साहित्य आणि कला यांचे प्रेमी, माजी राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू तसेच विविध खेळांमध्ये निपुण, समीर यांनी खेळाडूवृत्ती आणि सांस्कृतिक संवेदनशीलता यांचा सुंदर मेळ घातला आहे.
धूम्रपान न करणारे, कधीच मद्यपान न केलेले समीर दुधगांवकर हे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. त्यांनी अमेरिकेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पदवी घेतल्यानंतर “जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी” (माता व मातृभूमी स्वर्गापेक्षा जास्त मोलाची आहे) ही संकल्पना आचरणात आणून, अमेरिकेतील विद्यापीठातील प्रोफेसर वेन गिब्सन यांनी २०२३ मध्ये देऊ केलेली पीएचडीची पूर्ण संशोधन शिष्यवृत्ती नाकारून जन्मभूमीच्या सेवेसाठी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. छत्रपती श्री शिवाजी महाराज, स्वत:चे वडिल चारित्र्य-संपन्न मा. मंत्री खासदार गणेशराव दुधगांवकर यांना आदर्श मानत चारित्र्य-संपन्न नेतृत्व देण्याची, जन्मभूमीची सेवा करण्याची समीर यांची लहानपणापासूनच इच्छा होती.
शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात कायम पहिल्या पंधरा मध्ये राहिलेल्या समीर यांचे अभियांत्रिकी शिक्षणही पहिला दर्जा मिळवून पूर्ण झाले. अमेरिकेत चार पैकी ३.७ GPA मिळाले होते. जीवन श्रीमद्-भगवद्-गीतेच्या तत्त्वांवर, चारित्र्यवान विचारांवर आधारित ठेवण्याचा प्रमाणिक प्रयत्न समीर लहानपणापासून करीत आहेत. त्यांनी २००२ मध्ये अमेरिकेतील शिक्षणकाळातच श्रीमद्-भगवद्-गीतेचा सखोल अभ्यास सुरू केला, जो त्यांच्या वैचारिक नेतृत्वाचा आधारस्तंभ ठरतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ पासून गाजण्यापुर्वीपासूनच समीर यांनी अंतर्मनाच्या आवाजाला प्राधान्य देऊन दैवी शिकवणींना जीवनात अवलंबिले होते. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर अध्यात्मिक आहोत हे दाखवण्याची फॅशन आली, त्यामुळे नव्हे तर समीर यांनी २००२ पासूनच अंतर्मनाच्या आवाजाला अनुसरून दैवी शिकवणींना आत्मसात केले…!! समाजात आध्यात्मिक जागरूकता आणि नैतिक मूल्यांचा प्रसार व्हावा यासाठी ते सातत्याने जनतेसमोर श्रीमद्-भगवद्-गीतेच्या श्लोकांचे परिस्थितीशी जोडून विश्लेषण सुद्धा करतात. ह्यामुळे ते ईश्वरकेंद्रित कर्मयोगी आणि वैचारिक नेता म्हणून उदयास येत आहेत.


आई-वडिलांनी जाणीवपूर्वक परिवाराच्या कार्यापासून/वारश्यापासून दूर ठेवण्याचा दृष्टिकोण ठेवल्याने, लक्षपूर्वक मार्गदर्शन न केल्याने समीर सैद्धांतिक वागत स्वतःचा मार्ग शोधत राहिले. अमेरिकेतून परतल्यापासून २००३ ते २०१८ उद्योजक निर्माण करून देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी प्रयत्नरत होते, तेव्हा तोच मार्ग त्यांना सर्वोत्कृष्ट वाटला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नेतृत्व करून त्यांनी राज्यातील उद्योग क्षेत्राला नवे आयाम प्रदान केले असून, संपूर्ण परभणी जिल्ह्यात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानामुळे त्यांना एक वेगळे आणि सन्माननीय स्थान निर्माण झाले आहे. २०१६ मध्ये मात्र नावाजलेले उद्योजक डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची वाताहत थांबवण्यासाठी देशाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर समीर यांचा विचार बदलला. उद्योजक/गायक/खेळाडू/अभिनेते जर सरतेशेवटी राजकारणात येत असतील तर समाजसेवेचे परिवाराचे संचित वाया जावू द्यायचे नाही असे समीर यांनी ठरवले आणि समाजकार्यात ते लक्ष घालायला लागले.
गणेशराव नागोराव दुधगांवकर यांच्या चारित्र्य-संपन्न ऐतिहासिक पार्श्वभूमीने रचलेल्या पायावर उभे राहून, ते दर्जेदार जनसेवक, वक्ता आणि लेखक म्हणून समाजाला प्रेरणा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
अकोला उद्योजक संघटना तर्फे आयोजित उद्योजक मेळावा आणि महाराष्ट्र चेंबर कार्यकारिणी बैठक तसेच तत्कालीन नागालॅंड राज्यपाल पी बी आचार्य यांच्यासोबत
अमेरिकेतून परतल्यानंतर २००३ पासून त्यांनी केलेल्या महत्वाच्या कार्यांची यादी खालीलप्रमाणे…
(सिंचन, शेतकरी कल्याण, रोजगार, रस्ते, शिक्षण, मुलभूत सुविधा, प्रलंबित अडचणी यासाठी गावपातळीवरील आणि राष्ट्राच्या हिताकरिता केलेल्या समीरच्या अनेक कार्यांची नोंद विस्तृतपणे वेगळ्या पृष्ठांवर दिली आहे.)
महाराष्ट्रातील सर्वोच्च उद्योग संघटनेचे नेतृत्व म्हणून आणि एक उदयोन्मुख निर्व्यसनी राजकीय नेते म्हणून समीर दुधगांवकर यांची सातत्याने वाटचाल सुरु आहे.
- २००३ ते २००९ – अमेरिकेतून परतल्यानंतर ग्रामीण भागातील तरुणांमध्ये स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी दशकभर कार्य केले, जे मोदींच्या स्टार्ट-अप इंडिया (2016) च्या आधीचे आहे. या अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगाणा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, आणि पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध उद्योजकांचा विश्वास अर्जित केला आणि अनेकांशी दृढ संबंध प्रस्थापित केले.
- २०१० ते २०१४ :- बहुराष्ट्रीय कंपनीला विद्यार्थी विकासासाठी सल्लागार म्हणून कार्य
- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (MSBTE) येथे राज्यस्तरीय विद्यार्थी विकास प्रकल्प प्रस्तावित केले आणि मानसिक परिवर्तन होऊ शकते हि मान्यता मिळवली
- प्रभाव (अमूर्त): विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला, संवाद कौशल्ये सुधारली, आणि औद्योगिक समुदायाशी त्यांचे दृढ बंधन निर्माण झाले
- 2013 ते 2018 :- महाराष्ट्र चेंबरमधील राज्य उद्योग संघटना नेतृत्व :-
- उपाध्यक्ष म्हणून सेवा, 2021 मध्ये निर्विरोध निवडणूक सुनिश्चित केली आणि मराठवाड्याचे प्रतिनिधित्व वाढवले.
- गिनीज बुक मध्ये राज्याचे नाव घेवून जाणारी योजना “मागेल त्याला सौर कृषिपंप योजना” २०१५, २०२४ जून मंजुरी प्रक्रियेतील नेतृत्व
- महाराष्ट्र चेंबरच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), सौर पंप योजना, कामगार कायदे आणि समान नागरी संहिता यांना योगदान दिले
- प्रभाव: राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 25 कोटी+ विद्यार्थ्यांना लाभ देते; सौर कृषिपंप योजनेमुळे शेतकरी आत्महत्या कमी होणार आहेत आणि प्रत्येक लाख कोटी गुंतवणुकीवर 3–9:1 परतावा मिळतो
- तरुण रोजगारक्षमता कार्यक्रम:
- 22 ठिकाणी 7,000+ विद्यार्थ्यांना आणि SRTMU येथे 3,000+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले, तसेच झीरो इफेक्ट झीरो डिफेक्ट, संरक्षण क्षेत्रातील संधी या सारखे सरकारचे कार्यक्रम राज्यभर राबवले
- उद्योग-शैक्षणिक आणि CSR उपक्रम:
- MACCIA मध्ये उपजीविका मिशन आणि CSR समित्यांचे प्रतिनिधित्व, अनेक सामंजस्य करारांवर सही आणि अनेक विषयावरील कार्यशाळांचे नेतृत्व.
- महाराष्ट्र चेंबरच्या शिक्षण समितीने समीर यांच्या नेतृत्वात ऑगस्ट 2013 पासून संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात 21-22 जानेवारी 2018 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दृष्टीकोन बदल कार्यशाळा आयोजित केल्या. 2013 पासून चेंबरने शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला जोडण्यासाठी स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, मेंटॉरशिप आणि MoU यांसारख्या संकल्पनांवर कार्य सुरू केले. 2018 मध्ये अनुभवी उद्योजकांच्या नेतृत्वाखाली CMIA च्या MAGIC व्यासपीठाची स्थापना झाली.
- MAGIC या सेक्शन ८ कंपनीला महाराष्ट्र चेंबर सोबत जोडून राज्यभर महिला, युवकांना, उद्योजकांना प्रशिक्षित करण्याची, उद्योग उभे करण्याबाबतचे मार्गदर्शन मिळवण्याची चांगली व्यवस्था समीर यांनी केली
राजकीय कार्य सुरुवात २०१८ पासून :-
- 43 गाव समृद्धी समिती :- परभणी, मानवत आणि पाथरी येथील “43 गाव समृद्धी समिती”ने जून 2009 मध्ये 70 वर्षे जुन्या पाणी प्रश्नावर आमदारांनी केवळ नाटक केल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. 2018 मध्ये गावकऱ्यांच्या आग्रहास्तव या प्रश्नाच्या गांभीर्याला लक्षात घेऊन आंदोलन उभारले गेले. राज्य सरकारच्या मराठवाडा वॉटर ग्रिड मंजुरीमुळे पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल या आशेने आंदोलन स्थगित करण्यात आले. पुढे, या गावांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलनाचे रूपांतर “43 गाव समृद्धी समिती”मध्ये झाले. आमदार विटेकर यांनी हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये ही मागणी पुन्हा उपस्थित केली. आमदार विटेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सर्वेक्षणाचे जुलै 2025 मध्ये आदेश.
- गुप्तेश्वर महादेव मंदिर धारासूर ला ₹ २८ कोटी निधी मिळवून देणे
- शेतकऱ्यांना शेकडो कोटी पिक विमा मिळवून देण्याच्या आंदोलनाचे एक प्रमुख नेतृत्व
- गिनीज बुक मध्ये राज्याचे नाव नोंदविणारी योजना “मागेल त्याला सौर कृषिपंप योजना” २०१५, २०२४ जून मंजुरी प्रक्रियेतील नेतृत्व
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसवणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि CEO यांची ६ ऑगस्ट २०२२ रोजी ED कडे तक्रार त्यांना वठणीवर आणण्याची परिस्थिती निर्माण करून, निवृत्त कर्मचाऱ्याना त्यांचा हक्क मिळवून दिला. निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारले आणि पीडीसीसी बँकेच्या 1,000+ सध्याच्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले.
- CGTMSE संबंधित धोरण बदल करण्यात सहभाग – ज्यामुळे छोट्या शहरांमध्ये कर्ज वाटप वाढणार
- प्रभाव: 10,000+ MSMEs साठी ₹100 कोटी+ कर्ज सक्षम, GDP मध्ये ₹500 कोटी+ वाढ.
- सहकारी बँकांसाठी केलेल्या समर्थनामुळे दरवर्षी 75,000–200,000 तरुण आणि उद्योजकांना लाभ होऊ शकतो, यापैकी 52,500–160,000 टियर-2 आणि खालच्या शहरांमध्ये, ₹17,500–52,500 कोटींच्या बिनतारण कर्जाद्वारे. यामुळे 105,000–800,000 रोजगार (यापैकी 52,500–400,000 तरुणांसाठी) निर्माण होतात आणि या भागांमध्ये ₹61,250–183,750 कोटींची GDP वाढते. हे टीम समीरच्या स्वावलंबन आणि आर्थिक समावेशनाच्या दृष्टिकोनाशी संरेखित आहे, परभणीसारख्या उपेक्षित क्षेत्रांमध्ये संधी वाढवते.
- ग्राम सक्षमीकरण अभियान: सप्टेंबर 2024 मध्ये 400 स्वयंसेवक आणि 14 विभागांतील 1,000 अधिकाऱ्यांच्या सहाय्याने परभणी जिल्ह्यातील गावांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अभियानाला नवीन उंचीवर नेले
- ऑगस्ट २०२३ पासून श्रीमद् भगवद् गीता (अध्याय १८, श्लोक ६६) च्या प्रचारातून हिंदूंना योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न
- महिलांचे लग्नानंतर नाव बदलण्याची कायदेशीर मागणी थांबवण्याची मागणी
- पुरुष-विरोधी कायदे भारतीय घटनेच्या समानतेच्या मुद्दयाचा भंग करणारे आहेत ते बदलले पाहिजे ही मागणी
- ऑगस्ट २०२३ पासून होर्डिंग्जच्या जबाबदार वापराच्या धोरणाला प्रोत्साहन देण्यात राज्याचे नेतृत्व करणे




याद्वारे समीर यांनी सामाजिक सजगतेचा आदर्श घालून दिला आहे, ज्यामुळे मराठवाड्याच्या विकासात आणि समाजसुधारणेत त्यांचे सुद्धा योगदान अभूतपूर्व ठरत आहे. समीर हे परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच देशाचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी निष्ठावानपणे कार्यरत आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय भूमिका, भाजपातून राजीनाम्याचा राजकीय निर्णय :-
भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाच्या हक्कांसाठी अपेक्षित भूमिका बजावली नाही, यावर समीर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणवून घेतो. हिंदुत्व-रक्षक मराठा समाजाने मागील हजारो वर्षे ऐतिहासिकदृष्ट्या हिंदू समाजावरील अत्याचाराविरुद्ध लढा दिला आहे. लोकशाही आल्यानंतर आज शेती क्षेत्रात कार्यरत असलेला हा कुणबी समाज आर्थिक अडचणींमुळे मागासवर्गीय यादीत समाविष्ट करण्यासाठी लढत आहे. समीर यांनी लोकशाही मार्गाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
१४ ऑक्टोबर २०२३ मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे एक करोड लोकांच्या सभेचे आयोजन झाले, ज्यात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर एकजूट दिसली. त्याच काळात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे सुरू असताना, या अंतरवलीच्या सभेची साधी दखलही त्यांनी घेतली नाही, ज्यामुळे हिंदुत्व-रक्षक मराठा समाजाच्या भावनांना ठेच लागली आणि हिंद्त्वाचा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपने हिंदुत्व-रक्षक मराठा समाजाचा अपमान केल्याची भावना निर्माण झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर समीर यांनी २९ ऑक्टोबर २०२३ रोजी भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला, ज्यामुळे त्यांची सैद्धांतिक भूमिका अधोरेखित झाली.
आरक्षणासाठी मंत्र्यांच्या मुलानेही पक्ष सोडला ;
थेट मोदी – फडणवीसांनाच भिडले |
- “मराठा आरक्षणाच्या मागणीला योग्य महत्त्व न देणे” हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराज महादजी शिंदे आणि इतर सगळ्या हिंदुत्वाचे रक्षक यांच्या योगदानाचा अपमान आहे;
- भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईचा दावा करणाऱ्या मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजपने गेल्या ४० वर्षांत नागरिकांना लुटणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना आश्रय दिला. त्यांना आमदार व खासदार बनवले.
समीर दुधगांवकर यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनाम्यात देतांना म्हटले की, मराठा मागणीचा अवमान आणि भ्रष्ट नेत्यांना संरक्षण हे स्वीकारू शकत नाही; अशा पक्षात राहून स्वतःला ‘अन्यायाविरुद्ध’ लढणारा म्हणणे शक्य नाही.
मोदी सरकार यांचा दुटप्पीपणा उघड करणारा असा हा राजीनामा ठरला. जो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान ठरला. मराठा समाजाचा अपमान सहन न झाल्याने देण्यात आलेला समीर दुधगांवकर यांचा भाजपा सदस्यत्वाचा हा राजीनामा प्रामाणिक राजकारण आणि सामाजिक न्यायासाठी एक प्रेरणादायी कृती ठरत आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवारी –
समीर गणेशराव दुधगांवकर यांनी लोकार्पण केलेल्या जाहीरनाम्याची दखल झी २४ तास या न्यूज चॅनलने घेतली…
बेरोजगारी कमी करण्यासाठी नौकऱ्या दुप्पट करणे योजना, कलम ३७१ च्या माध्यमातून मराठवाड्याचा अनुशेष भरून काढणे, प्रत्येक तालुक्यात ३०० करोड रुपयांचे क्रीडा/करमणूक संकुल बांधणे तसेच मराठा समाजाच्या हक्कांसाठीच्या लढ्यात सक्रीय राहणे या सारख्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर समीर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
हा निर्णय भूमिपुत्रांसाठी न्याय मिळवून देण्याच्या आणि उच्चशिक्षित नेतृत्वाच्या संकल्पाचा प्रतीक ठरला. जरांगे पाटील यांनी सक्षम उमेदवारांना प्रोत्साहन दिले असले तरी, केवळ आंदोलक म्हणून कोणीही उभे राहू नये असे सांगितले होते. जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी कार्य करेल असा बॉन्ड देणाऱ्या उमेदवारांना समर्थन देण्याचे आवाहन केले होते. समीर ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम, स्वकर्तुत्ववान असल्याने आणि मराठा समाजाला बॉन्ड देणारे राज्यातील एकमेव उमेदवार होते म्हणून टीमने समीर यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला. उमेदवार बनण्याआधी १ एप्रिल २०२४ रोजी खालील फोटोत दिसणाऱ्या अनेक जणांच्या साक्षीने जरांगे पाटील यांच्यासोबत ४० मिनिटे चर्चा केली.
“मी तुम्हाला उभे रहा म्हणणार नाही किंवा उभे नका राहू असेही म्हणणार नाही. परिस्थिती बघून तुम्ही ठरवा.” जरांगे पाटलांच्या या वाक्यानंतर/संदेशानंतर समीर दुधगांवकर अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले.


जरांगे पाटील यांनी मतदानाच्या आदल्या रात्री गढुळ वातावरण चांगले करण्यासाठी एक व्हिडीओ बनवला ज्यात निक्षुणपणे सांगितले की, “मी कोणत्याही पक्षाला चांगले म्हणालो नाही. दोन्ही आघाड्या आणि युतीने मराठ्यांचे वाटोळे केले आहे. त्यांच्या पैकी एकाला मतदान करा असे मी कसे म्हणेल? “डोके सडले का रे तुमचे? बधीर झाले का तुम्ही? युती आणि आघाडी दोघांचे उमेदवार पाडा हे मी बारबार सांगितले. जो लेखी देईल त्याला मदत करा, मतदान करा. जो समाजाच्या बाजूने बॉन्ड देईल त्याच्या बाजूने मतदान करा..”
पण आंदोलकांनी ते ऐकले नाही आणि समीर यांना अपयश आले. जरी अपेक्षित निकाल नाही लागला तरी विकासासाठी, समाजासाठी प्रामाणिक लढा दिल्याचा टीम समीर गणेशराव दुधगांवकर यांना आनंद आहे. लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा धक्का बसला, भाजपा-मुक्त मराठवाडा झाला, ज्याद्वारे आंदोलनाचा प्रभाव स्पष्ट झाला. सतराव्या शतकातील मोठ्या युद्धात बलिदान दिलेल्या गावातील लोक असण्यापासून सुरु झालेला प्रवास, छत्रपतींच्या/निझामाच्या राज्यातील सगळ्यात मोठा अध्यात्मिक सन्मान १९१५ पासून सांभाळणारे शिंदे दुधगांवकर असण्यापर्यंत, भारतातील नवीन अश्या लोकशाहीत १९७४ तसेच १९८३ मध्ये मुख्यमंत्री बदलण्याच्या घडामोडीं मधील गणेशराव दुधगांवकर नाव असण्यापर्यंत ते हिंदुत्व-रक्षक मराठ्यांचा अपमान न सहन करणाऱ्या, अयोध्या राम मंदिर होवून सुद्धा मोदी सरकारला अडचणीत आणणारे लोकसभा निकाल लावणाऱ्या टीम मधील समीर गणेशराव दुधगांवकर हे एक नाव असण्यापर्यंतचा हा सत्यासाठी लढणाऱ्या लोकांचा प्रवास अविरतपणे सुरु असल्याचा आनंद आहे.
थोडक्यात :-
महाराष्ट्रातील सर्वोच्च उद्योग संघटनेचे नेतृत्व म्हणून आणि एक उदयोन्मुख निर्व्यसनी राजकीय नेते म्हणून समीर दुधगांवकर यांची सातत्याने वाटचाल सुरु आहे. ते श्रीमद -भगवद-गीता अभ्यास करतात आणि अध्यात्मिक मूल्यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स माजी उपाध्यक्ष म्हणून ते २०१३ पासून आजीवन राज्य कार्यकारिणी पदाधिकारी आहेत ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि उद्योजकता वाढीसाठी. भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व त्यागून त्यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी, नौकऱ्या दुप्पट करणे प्रकल्पांसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि युवकांना नव्या दिशा मिळवून देण्यात खारीचा वाटा आहे.
समीर दुधगावकरांच्या उपक्रमांचा संभाव्य प्रभाव: एक सारांश डॅशबोर्ड :-
समीर दुधगांवकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांचा संभाव्य प्रभाव खालीलप्रमाणे सारांशित केला आहे. आकडे उपलब्ध माहिती, सरकारी योजना आणि उद्योग अभ्यासावर आधारित आहेत.
- गुप्तेश्वर महादेव मंदिर धारासूर ला ₹ २८ कोटी निधी मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंघ पटेल यांच्या भेटी घेणे, सक्रीय असणे
- शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून देणे
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला धाब्यावर बसवणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि CEO यांची 6 ऑगस्ट २०२२ रोजी ED कडे तक्रार करून त्यांना वठणीवर आणण्याची परिस्थिती निर्माण करून, निवृत्त कर्मचाऱ्याना त्यांचा हक्क मिळवून देणे
- सिंचनातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे (विस्तृत माहिती ग्रामस्तरीय कार्य या पृष्ठावर आहे)
- सहकारी बँकांचा CGTMSE मध्ये समावेश होणे ज्यामुळे छोट्या शहरातील युवक आणि उद्योजकांना कर्ज मिळणे सुलभ करणे
- सौर कृषिपंप योजना पूर्ण प्रमाणात विस्तार (४५ लाख शेतकरी कुटुंबांसाठी फायदा)
- मराठा कुणबी प्रमाणपत्रे मिळवून देण्याच्या लढ्यात सक्रीय आक्रमक योगदान देणे
- . ऑगस्ट २०२३ पासून श्रीमद् भगवद् गीता (अध्याय १८, श्लोक ६६) च्या प्रचारातून हिंदूंना योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न करणे
- नोकऱ्या दुप्पट (किमान २ कोटी नवीन नोकऱ्या)
- राष्ट्रीय महामार्ग पहिल्या मार्गीकेबाबत संकल्पना, vanity नंबर प्लेट द्वारे हजारो करोड महसूल वाढ संकल्पना इत्यादी
- व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी एक प्रमुख प्रेरणा बनणे
- पर्यावरणाचे होणारे नुकसान, विद्रूप होणारी शहरे बघून, भपकेबाजी कमी करण्यासाठी बॅनरबाजी कमी होण्यासाठी पुढाकार घेणे
- उद्योजक विकास आणि विद्यार्थी मार्गदर्शन
- विश्व शांती योजना
यांचा समावेश आहे.
समीर यांचे काही उपक्रम आणि ग्रोक एआय च्या मते त्याचे अपेक्षित परिणाम तक्ता -
समीर यांचे सध्या अपक्ष कार्य सुरु आहे आणि महत्वाच्या मुद्यांवर पाठपुरावा घेणे सुरु आहे.
१२५+ वर्षांच्या आध्यात्मिक वारशात रुजलेले आणि अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित, समीर यांचे शिक्षण, रोजगार आणि सामाजिक समरसतेतील प्रयत्न परभणीच्या १.८३ दशलक्ष हून जास्त रहिवाशांचे जीवन उंचावण्याची क्षमता राखतात. जर समीर यांना अधिक पाठबळ मिळाले, तर त्यांच्या विचारांमधून आणि आचरणातून परभणीच काय पण अख्या जगाच्या लोकसंख्येसाठी छत्रपती शिवरायांच्या आणि दिल्ली दिग्विजयवीर महाराज महादजी शिंदे यांच्या स्वप्नातील शाश्वत विकास सत्यात उतरू शकतो.
| उपक्रम | परिणाम |
|---|---|
| मागेल त्याला सौर कृषिपंप योजना २०१५/२०२४ | राज्याच्या ४६ लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार डिसेंबर २०२५ पर्यंत राज्याच्या ८ लाख शेतकऱ्यांचे कृषिपंप कार्यान्वित |
| भाजप-मुक्त मराठवाडा लोकसभा २०२४ मध्ये योजना अपेक्षित स्वरूपात लागू करण्यासाठी सहभाग | महाराष्ट्र चेंबर उपाध्यक्ष म्हणून २०१५ मध्ये योजना मंजुरीत सहभाग तसेच मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून योजना विस्तार आणि मंजुरीत सहभाग |
| अकराव्या शतकातील गुप्तेश्वर महादेव मंदिर पुनुरुज्जीवन प्रकल्प मंजुरी | ₹ २८ कोटी मंदिर निधी मिळवून देण्यात सक्रीय सहभाग |
| उपक्रम | परिणाम |
|---|---|
| आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून दिला | ₹ ४१० कोटी पीक विमा मिळवून देण्यात सक्रीय सहभाग २०२५ मध्ये पुराव्याभावी निर्दोष मुक्तता |
| सहकारी बँकांचा CGTMSE मध्ये समावेश | १०००० हून अधिक MSMEs साठी १०० कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुलभ जीडीपीमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक वाढ ७५००० ते २००००० तरुणांना लाभ १०५००० ते ८००००० रोजगार निर्मिती |
| नौकऱ्या दुप्पट करणे संकल्पनेसाठी ऑक्टोबर २०१७ पासून प्रयत्न | १ कोटी ते ३ कोटी नोकऱ्या निर्माण शक्यता स्थानिक रोजगारात वाढ |
| बॅनरबाजी खर्च वाचवणे | गरिबांना थेट मदत करणारी संकल्पना |
| ग्राम सक्षमीकरण अभियान | गावोगावी विकासाला चालना देणारी संकल्पना |
पुढील पृष्ठ समीर यांच्या कार्याबाबत विस्तृत माहितीसाठी -
दूरदृष्टी लाभलेले नेतृत्व समीर यांचे बाबत इतर पृष्ठे :-
- समीर यांचा विस्तृत प्रवास
- समीर यांचे गावपातळीवरील कार्य
- राज्य, राष्ट्रीय पातळीवरील कार्य
- समीर यांचे विशेष अभ्यास क्षेत्र, आवडी, महत्वाच्या प्रकल्प संकल्पना
किंवा खाली दिलेले ग्रोक पृष्ठ पहा: